महात्मा फुले यांचे विचार देशहिताचे
एम. डी. चंदनशिवे; आनेवाडीत स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सातारा
महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य हे देशहिताचे असून, ते आजच्या सामाजिक स्थितीतही दिशादर्शक आहेत. त्यांनी आपले सारे आयुष्य सर्व समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची टाकले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि माणुसकीची शिकवण देणारे त्यांचे विचार आत्मसात केल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मकरीत्या आमूलाग्र बदल घडेल, असे प्रतिपादन बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य एम. डी. चंदनशिवे यांनी केले.
आनेवाडी (ता. जावळी) येथे श्री गणेश क्रीडा मंडळ आणि सर्व ग्रामस्थांतर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा फुले‘ या विषयावर ते बोलत होते. सरपंच वैशाली फरांदे, गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तुषार फरांदे, आकाश फरांदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
श्री. चंदनशिवे म्हणाले, “महात्मा फुले यांनी केवळ शिक्षण क्षेत्रात काम केले नाही, तर मानवी जीवनात परिवर्तन घडवण्राया प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. ते पुणे महापालिकेचे कमिशनर होते. या काळात त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी स्त्राr-पुरुष समतेची शिकवण दिली. त्यामुळे आज महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळत आहे. कृषी क्षेत्रातही फुलेंनी केलेले काम आदर्शवत, दिशादर्शक आहे. त्यांनी शेतक्रयांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी मागणी केली. शेतक्रयांना शेतीसंबंधित येण्राया अडचणी मांडून त्यांवर उपाय सुचविले. धरणे बांधून पाणी अडवून त्याचा शेतीसाठी वापर सुरू केला. शेतक्रयांचे कशी पिळवणूक होते हे शेतक्रयाचा आसूड या पुस्तकातून दाखवून दिले. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन शिवजयंती सुरू केली. पोवाडा लिहून शिवरायांचा इतिहास समोर आणला. त्यांनी जात, धर्म हे मानवनिर्मित असून, सर्व मानव एक असल्याचे सांगून माणुसकीची शिकवण दिली. आज देशभरात जे काही सामाजिक बदल दिसत आहेत, त्यामागे महात्मा फुलेंचे विचार आहेत.“
याप्रसंगी आरव फरांदे, साईराज फरांदे, अनुश्री फरांदे, आराध्या फरांदे, राजवीर सपकाळ या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. एसटी महामंडळाचे अधिकारी शेखर फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिक्रायांसह मंडळांचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिष्यवृत्तीचे वाटप ...
दिवंगत स्वरूप विनायक फरांदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीय विजय फरांदे, स्वतेश फरांदे यांच्या वतीने आरव फरांदे या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देण्यात आली.