मल्हार निंबाळकर यांना कॅलिफोर्नियात युसी डेव्हीसची पदवी प्रदान
12:34 PM Jun 18, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : माजी आमदार तसेच एआयसीसीच्या सचिव अंजली निंबाळकर व राज्य माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर यांचा मुलगा मल्हार निंबाळकर याने कॅलिफोर्नियातील (अमेरिका) युसी डेव्हीस महाविद्यालयातून कला आणि विज्ञान शाखेतून उच्च श्रेणीत पदवी संपादन केली आहे. मल्हार निंबाळकर यांनी अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे. कॅलिफोर्नियातील साक्रामेंटो गोल्डन सेंटरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पदवी प्रदान सोहळ्यात मल्हार निंबाळकर यांना पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला वडील हेमंत निंबाळकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर व बहीण रखमा उपस्थित होत्या. या यशामुळे मल्हार निंबाळकरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article