For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाड पंचक्रोशीत नाभिक संघटनेचा कार्यक्रम संपन्न

04:41 PM Aug 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मळेवाड पंचक्रोशीत नाभिक संघटनेचा कार्यक्रम संपन्न
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुका नाभिक संघटना विभाग मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेकडून आपल्या न्याती बांधण्यासाठी एक छोटेखानी मेळावा आयोजित करुन त्यात होतकरु व्यवसायिकांचा सत्कारही आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम मळेवाड येथील श्री गजानन महाराज पतीत पावन भक्ती मंदिर येथे संपन्न झाला.या कार्क्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे व सुरेश पाटील उपस्थित होते.श्री मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना दिवसेंदिवस नाभिक बांधव जो आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत.त्यामध्ये अनेक समस्या याठिकाणी दुकान वाढत असून ही एक मोठी समस्या भविष्यात नाभिक समाजासमोर उभी राहणार आहे.त्यामुळे नाभिक समाजाने पारंपारिक केस कापण्याचा व्यवसाय करतात त्यामध्ये नवनवीन उपकरणांचा वापर करुन आपल्या व्यवसायात कशी वाढ होईल या दृष्टीने विचार करुन योग्य पावला उचलंण काळाची गरज आहे. तसेच भविष्यातही आपल्या संघटनेला कोणत्या प्रकारची मदत लागल्यास आपण नेहमी आपल्याला मदत करु असेही आश्वासन हेमंत मराठे यांनी दिले.या मेळाव्यात मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेमधील सर्व सभासदांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच होतकरु जेष्ठ व्यवसायिक पुरुषोत्तम न्हावी,उत्तम न्हावेलकर,लक्ष्मण न्हावी,सखाराम चव्हाण,यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मळेवाड पंचक्रोशी नाभिक विभाग अध्यक्ष अजय न्हावी,उपाध्यक्ष नवनाथ तिरोडकर,सचिव आनंद न्हावेलकर,खजिनदार संदेश आरोसकर,सल्लागार सुनिल न्हावेलकर,भूषण न्हावेलकर,नंदकिशोर चव्हाण,आनंद न्हावी,अमोल न्हावी,अमित न्हावी,अनिल तळवणेकर,सिद्धेश न्हावी उपस्थित होते.सूत्रसंचालन नवनाथ तिरोडकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.