10 वर्षांनी रहस्य दूर करण्याच्या प्रयत्नात मलेशिया
पुन्हा सुरू होणार बेपत्ता विमानाची शोधमोहीम
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता विमान एमएच370 च्या अवशेषांचा शोध 30 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा मलेशियाने केली आहे. 239 प्रवाशांसह हे विमान एक दशकापूर्वी गायब झाले होते. तर नवा शोध 55 दिवसांपर्यंत चालणार असून याचा उद्देश प्रभावित परिवारांना एक सांत्वना देणे आहे.
मलेशियन एअरलाइन्सचे दीर्घकाळापासून बेपत्ता विमान एमएच370 च्या अवशेषांचा शोध पुन्हा सुरू होणार आहे. नव्या मोहिमेचा उद्देश प्रभावित परिवारांना एक निष्कर्ष देण्याची प्रतिबद्धता दर्शवितो असे मलेशियाच्या परिवहन मंत्रालयाने बुधवारी सांगितले आहे. हे बोइंग 777 विमान 2017 साली क्वालांलपूर येथून बीजिंगसाठी प्रवास करताना गायब झाले होते. या घटनेने विमानो•ाणाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शोधाला जन्म दिला होता.
खराब हवामानामुळे थांबले होते शोधकार्य
पुन्हा सुरू होणारी शोधमोहीम 55 दिवसांपर्यंत चालणार आहे. यापूर्वी मार्च महिन्यात शोध सुरू करण्यात आला होता, परंतु खराब हवामानामुळे ही मोहीम काही काळानंतर रोखण्यात आली होती. आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शोधमोहिमेत सागरी संशोधन कंपनी ओशन इनफिनिटी सामील असेल. ही कंपनी विमानाचे अवशेष मिळण्याची सर्वाधि शक्यता असलेल्या भागात शोध घेणार आहे.
विमानो•ाण इतिहासातील सर्वात मोठे रहस्य
फ्लाइट एमएच 370 बेपत्ता होणे विमानो•ाणाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. 2014 मध्ये बेपत्ता झाल्यावर अनेक मोठ्या शोधमोहिमानंतरही विमानाचे मुख्य अवशेष अद्याप मिळू शकलेले नाहीत. मलेशियन सरकारने ओशन इनफिनिटीसोबत ‘नो-फाइंड, नो-फी’ करारावर सहमती दर्शविली आहे. याचा अर्थ सार्थक अवशेषांचा शोध लागला तरच कंपनीला शुल्क देण्यात येणार आहे.