मानवी मूत्रापासून बियरची निर्मिती
मानवी मूत्राचे अनेक उपयोग असू शकतात, काही लोक मूत्र प्राशन करण्याचा प्रकार करतात. तर वैज्ञानिकांनी आता मानवी मूत्रापासून पाणी निर्माण करण्याचे तंत्रज्ञान तयार केले आहे. तसेच आता स्वीडनच्या वैज्ञानिकांनी अनोखा आणि चकित करणारा प्रयोग केला आहे. तेथे वैज्ञानिकांनी मानवी मूत्राचा वापर करत पर्यावरण-अनुकूल बियर निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तसेच याच्या व्यावसायिक उत्पादनावरही काम सुरू असून काही वर्षांमध्ये ही बियर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या संशोधकांनी वालपुर्गिस नाइट उत्सवादरम्यान पोर्टालूज म्हणजेच चलित शौचालयांमधून 20 हजार लिटर मूत्र जमा केले. हा उत्सव दरवर्षी 30 एप्रिल आणि 1 मे दरम्यान साजरा केला जातो. या मूत्राचा संशोधकांनी खासप्रकारे वापर करत बियर निर्माण केली.
खतनिर्मिती देखील
संशोधकांनी प्रथम या मूत्राला एका विशेष प्रक्रियेद्वारे खतात रुपांतरित केले. यानंतर त्याचा वापर 1.5 हेक्टर कृषीभूमीवर केला, ज्याद्वारे खास प्रकारचे जौ निर्माण करण्यास मदत मिळाली, ज्याद्वारे बियर निर्माण होते, याला माल्टिंग जौ म्हटले जाते. या खताद्वारे उगविण्यात आलेल्या जौद्वारे निर्मित बियर 2027 मध्ये बियरप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.
कसे तयार होते खत
मागील वर्षी जमविण्यात आलेले मूत्र तीन आठवड्यांपूर्वी गोटलँडच्या एका शेतात वापरण्यात आले, जेथे माल्टिंग जौ उगविण्यात येत आहे असे एसएलयूमधी सायकल टेक्नोलॉजीचे प्राध्यापक ब्योर्न विनेरास यांनी सांगितले. खत निर्मितीच्या प्रक्रियेत वैज्ञानिकांनी मूत्रातून 95 टक्के पाणी वेगळे करत त्याला कंसट्रेट रुपात बदलले, यानंतर फर्मने या पदार्थाला खतात रुपांतरित केले, जे शेतीयोग्य निर्माण करण्यात आले. हे खत पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित अन् प्रभावी आहे. या खताद्वारे उगविण्यात आलेल्या जौला बियर निर्मितीत वापरण्यात येणार आहे. हे निरंतर कृषी आणि साधनसंपदा रिसायकलिंगच्या दिशेने क्रांतिकारक पाऊल आहे.