ज्वालामुखीच्या राखेच्या मदतीने मद्याची निर्मिती
स्पेनच्या केनरी बेटांवर ज्वालामुखीची काळी राख द्राक्षांसाठी खत ठरत आहे. तेथे लांजारोटे आणि टेनेरिफेच्या जंगली भागांमध्ये द्राक्षांचे पिक घेतले जात आहे. हे काही साधारण शेत नाही, द्राक्षांना वाऱ्यापासून वाचविण्यासाठी शेतामध्ये प्रथम ख•s खणले जातात, जे लाव्हारसाच्या मातीतील भरपूर खनिजांद्वारे स्वादिष्ट वाइन तयार करण्यास हातभार लावतात.
मालवासीया वोल्कॅनिका यासारख्या दुर्लभ द्राक्षांद्वारे तयार या वाइन्स मिनरल रिच आहेत, ज्या अँटीऑक्सीडेंटने भरपूर असतात. परंतु हवामान बदल आणि पर्यटनामुळे ही पंरपरा धोक्यात येऊ लागली आहे. 500 वर्षे जुनी ही कला आता युनेस्कोच्या नजरेत पर्यटकांना आकर्षित करत आहे. स्पेनच्या सागर किनाऱ्यापासून हजारो किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात विखुरलेल्या केनरी बेटांच्या काळ्या, ओसाड राखभूमीवर एक चमत्कारिक दृश्य दिसून येते. येथे काळ्या राखेत द्राक्षांचे पिक घेतले जाते. हे काही साधारण पीक नाही तर 500 वर्षे जुनी परंपरा आहे. तेथे लांजारोटे आणि टेनेरिफे यासारख्या बेटांवर द्राक्षांचे पीक घेतले जाते. या द्राक्षांनी निर्मित वाइन्स जगभरातील मद्यपीप्रेमींना मंत्रमुग्ध करतात. हा स्वाद केवळ मातीची कमाल नसून निसर्गाची क्रूरता आणि मानवी जिद्दीचा मेळ आहे.
ज्वालामुखीने केले होते उद्ध्वस्त
केनरी बेटसमूह स्पेनचा हिस्सा आहे, परंतु भौगोलिक दृष्ट्या हे आफ्रिकेच्या नजीक आहे. येथील माती लाव्हारसाच्या राखेतून निर्माण झाली असून ती काळ्या रंगाची आहे. तरीही ही राख द्राक्षांसाठी वरदान आहे. ज्वालामुखीच्या भस्ममध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि अन्य खनिजे मोठ्या प्रमाणात असतात, जी द्राक्षांना अनोखा मिनरल स्वाद देतात. लांजारोटे बेटावर हजारो वर्षांपूर्वी अखेरचा ज्वालामुखी विस्फोट झाला होता. तेथील शेतकरी ‘हॉयोस’ म्हटले जाणारे ख•s खोदतात. हे ख•s 4-5 मीटर रुंद आणि खोल असतात, जेथे द्राक्षाची रोपं लावली जातात, त्यावर लाव्हाचे आच्छादन पसरविले जाते, जे आर्द्रतेला रोखून वाऱ्यांपासून वाचवितात. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची कमतरता असलेल्या भागांमध्येही पिक चांगल्याप्रकारे येते.
स्वादिष्ट द्राक्षं : द्राक्षांच्या प्रमुख प्रजाती मालवासीया वोल्केनिका हे केवळ केनरी बेटावरच आढळून येते. ही पांढरी द्राक्षं लांजारोटेच्या 80 टक्के वाइनयार्ड्समध्ये उगविली जातात. अन्य प्रजाती लिस्टार ब्लँको आणि लिस्टान नेग्रो असून त्या बेटांच्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचा आधार आहे. टेनेरिफे हे केनरीतील सर्वात मोठे बेट असून तेथे 65 टक्के वाइन उत्पादन होते. टेनेरिफेचा टेडे ज्वालामुखी आसपासच्या भागांना पिकाऊ स्वरुप देतो. शेतकरी पर्वतीय भागांमध्ये छतांसारखी जिनावजा शेती करतात, केनरीत दरवर्षी 35 लाख लिटर वाइन तयार होते.