महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेवा सिंधू सर्व्हिस कॉमन सर्व्हिस सेंटरला उपलब्ध करून द्या

11:02 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शासनाच्या योजना सर्वसामान्यांना मिळवून देण्यात सीएसी केंद्रांची महत्त्वाची भूमिका असते,परंतु सध्या राज्य सरकारने केवळ ग्रामीण भागातील ग्राम वन व शहरी भागातील कर्नाटक वन यांच्या माध्यमातून विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या ऐवजी सेवा सिंधूद्वारे सर्वच कॉमन सर्व्हिस सेंटरला ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनतर्फे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली. शहरात मोजक्याच ठिकाणी बेळगाव वन कार्यालय असल्याने नागरिकांना तासन्तास रांगांमध्ये उभे रहावे लागते. सर्व्हरडाऊनमुळे लाभार्थ्यांना योजनांचा फायदा मिळत नाही. त्यामुळे सेवा सिंधू ही सर्व्हिस सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरला उपलब्ध केल्यास सर्वसामान्यांचा लाभ होईल. जिल्हा समन्वयक मल्लिकार्जुन करेरुद्रन्नावर, सुनील जाधव, अध्यक्ष राजेंद्र बदरगडे, उपाध्यक्ष समीमुल्ला, मृत्युंजय मंत्रण्णावर, कामाण्णा चौगुले उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article