For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

04:55 PM Nov 20, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा   जिल्हाधिकारी संतोष पाटील
Advertisement

                प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्सव उत्साहात होणार साजरा

Advertisement

सातारा : किल्ले प्रतापगड येथे 27 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवप्रताप दिन तयारीचा आढावा जिल्हाधिकारी  पाटील यांनी घेतला. या बैठकीला उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

किल्ले प्रतापगडावर विद्युत रोषाणई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  पाटील म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी एस. टी. महामंडळाने बसेसची सोय करावी. प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी. महाबळेश्वर ते प्रतापगड व प्रतापगड ते पोलादपूर या रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असताना सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Advertisement
Tags :

.