कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामीण भागातील ग्रंथालये आदर्श बनवा

11:11 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे : ग्रंथपाल-पर्यवेक्षकांच्या बैठकीत सूचना : उपयुक्त पुस्तकेही उपलब्ध करणे आवश्यक

Advertisement

बेळगाव : ग्रंथालयांमध्ये इतिहास, सामाजिक, समाजशास्त्र, कथा, कादंबऱ्यांबरोबर तरुणांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ग्रंथालये आदर्श केंद्रे बनली पाहिजेत, असे आवाहन जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी केले आहे. जिल्हा पंचायत कार्यालयात शनिवारी ग्रा. पं. ग्रंथपाल आणि पर्यवेक्षकांची बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ग्रंथालयांतून शिक्षण, आवड, धोरण, विचारशिलता अभ्यासाचे नियोजन, बौद्धिक क्षमता आणि स्पर्धा परीक्षांसाठी तरुणांना अनुकूल माहिती उपलब्ध झाली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावातून ग्रंथालयांच्या सेवा आणि चांगल्या कार्यासाठी प्रत्येकांनी काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Advertisement

ग्रामपंचायत  कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व ग्रंथपालांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. या आधारावरच त्यांना मासिक वेतन दिले जाणार आहे, असेही जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक यांनी सांगितले. ग्रंथपालांनी कामावर वेळेत हजर राहून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी. ग्रंथालयांची स्वच्छता आणि पुस्तकांची ठेवण नीटनेटकी असावी. त्याचबरोबर युपीएससी आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये लागणाऱ्या पुस्तकांचे संकलन करून विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही हेग्गनायक यांनी केल्या. यावेळी ग्रामपंचायत ग्रंथपाल आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article