महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा

10:21 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आवाहन : रमाकांत खलप यांच्या प्रचाराचा शुभारंभ्

Advertisement

पेडणे : भाजप सरकारने लोकशाही संपविली आहे. विविध घोटाळे करणाऱ्या आणि वारंवार लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजप सरकारला रोखण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली आहे. भारताचे संविधान बदलण्याचे कारस्थान भाजप सरकार आखत असून, देश विकू पाहणाऱ्या भाजपच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दक्षिण गोव्याचे उमेदवार पॅप्टन विरियतो फर्नांडिस, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, हळदोणाचे आमदार कार्लुस परेरा, आमदार क्रूज सिलवा,  आमदार एल्टन डिकॉस्ता, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर, काँग्रेस नेते बाबी बागकर, शिवसेना अध्यक्ष जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस  दुर्गादास कामत, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, तृणमूल काँग्रेसचे जयेश  शेटगावकर, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, उपाध्यक्ष सुनिल कवठणकर, उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस  प्रणव परब, मांद्रे गट अध्यक्ष नारायण रेडकर, पेडणे गट अध्यक्ष कृष्णा नाईक, सचिव ?ड जितेंद्र गावकर, प्रमेश  मयेकर, राजन घाटे, शिवसेनेचे सुभाष केरकर, काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र गावकर, आश्विन खलप, प्रदीप हरमलकर आदी उपस्थित होते.

Advertisement

दोन्ही जागांवर विजयी करा

माजी कायदामंत्री तथा उत्तर गोवा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमाकांत खलप  यावेळी म्हणाले की मागच्या पंचवीस वर्षांमध्ये निवडून आलेल्या खासदाराने लोकसभेत गोव्याचा आवाज का उठवला नाही? गोव्याचे प्रŽ, गोव्याच्या समस्या केंद्र सरकारसमोर का ठेवल्या नाही? असा सवाल करून आता यापुढे गोव्याचा आवाज काँग्रेसमार्फत बुलंद करण्यासाठी गोमंतकीयांनी दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याची गरज आहे.

आज नव्या क्रांतिचा निर्णय

आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले की आज ज्या पवित्र दिनी विश्वाची ब्रम्हाने निर्मिती केली, त्याच पवित्र दिनी आज हुतात्मा स्मारकाकडे भारत आघाडीच्या सर्व पक्षातील कार्यकर्ते, नागरिक, समर्थक उमेदवारांनी एकत्र येऊन आज नवी क्रांती करण्याचा निर्णय घेतला.

गोवा वाचविण्याची गरज

यावेळी बोलताना  हळदोणाचे  आमदार  कार्लुस परेरा म्हणाले की भाजपने गोवा संपविला आहे. आता वेळ आली आहे ती गोवा वाचविण्याची. यासाठी इंडिया आघाडीत सर्व पक्ष येऊन हा लढा सुऊ केला आहे. या लढ्याला साथ देत गोव्यातील दोन्हीही लोकसभेचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन आमदार कार्लुस परेरा यांनी केले. शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दीपक कळंगुटकर, राजन घाटे, जयेश शेटगावकर, नारायण रेडकर आदींनी मनोगते व्यक्त केली. इंडिया आघाडीचे उमेदवार, नेते पत्रादेवी हुतात्मा स्मारकजवळ खास बसने आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article