For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समग्र शिशु विकास योजनेसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करा

10:54 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
समग्र शिशु विकास योजनेसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करा
Advertisement

अंगणवाडी कार्यकर्त्या-साहाय्यिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Advertisement

बेळगाव : 2024-25 च्या अर्थसंकल्पात समग्र शिशु विकास योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघटनेने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन पाठवण्यात आले. बुधवारी सकाळी मंदा नेवगी, मीनाक्षी डाफळे, शामला तळवार, उज्ज्वला लाखे, अनिता पाटील, अनिता दंडगलकर, सुषमा रजपूत, वंदना चव्हाण, सुनीता मेंडके, बी. बी. बस्तवाड आदींनी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आले.

चालू महिन्यात पूर्ण प्रमाणात केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. गेल्या पाच दशकांपासून 26 लाखांहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्या कार्यरत आहेत. सरकारने अद्याप त्यांना सुविधा पुरविल्या नाहीत. समग्र शिशु विकास योजनेंतर्गत अनेक ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून पौष्टिक आहार पुरवठाही झाला नाही.  या योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व पेन्शन द्यावे. अर्थसंकल्पात यासाठी आवश्यक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली असून आयसीडीएस योजनेसाठी अनुदान वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.