कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुजुमदारच्या शतकाने बंगालला सावरले

06:11 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / सुरत

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट क गटातील सामन्यात अनुस्थुप मुजुमदारचे शतक तसेच शहबाज अहमदच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगालने रेल्वे विरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 273 धावा जमविल्या.

Advertisement

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बंगालने घेतला. मात्र रेल्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ 27 धावांत बाद झाले. सुरज जैस्वाल 5 धावांवर, आदित्य पुरोहीत 6 धावांवर बाद झाले. कर्णधार सुदीप घरमीला खातेही उघडता आले नाही. हबीब गांधीने 28 धावांचे योगदान दिले. त्यानंतर अनुस्थुप मुजुमदारने संघाचा डाव सावरताना शानदार शतक झळकविले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपले 18 वे शतक त्याने नोंदविले. मुजमदार 161 चेंडूत 103 धावांवर खेळत असून शहाबाज अहमदने 106 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 86 धावा झळकविल्या. मुजुमदार आणि शहाबाज यांनी पाचव्या गड्यासाठी 134 धावांची भागिदारी केली. रेल्वेतर्फे कुनाल यादवने 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक:बंगाल प. डाव 85 षटकात 5 बाद 273 (मुजुमदार खेळत आहे 103, शहाबाज अहमद 86, गुप्ता खेळत आहे 39, गांधी 28, कुनाल यादव 3-56)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article