चीनमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू
07:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बीजिंग : चीनच्या युनान प्रांतात गुरुवारी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांना जीव गमवावा लागला. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका समुहाला रेल्वेगाडीने धडक दिल्याने घडली आहे. भूकंपमापन उपकरणांचे परीक्षण करणाऱ्या रेल्वेने कुनमिंग शहराच्या लुओयांग टाउन रेल्वेस्थानकाच्या आत एका वळणदार हिस्स्यात रेल्वेमार्गावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धडक दिली. दुर्घटनेनंतर त्वरित रेल्वे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि पीडितांसाठी बचाव अभियान सुरू करण्यात आले. काही काळानंतर रेल्वेस्थानकावरील सामान्य परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement