महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकमध्ये निवडणुकीवेळी मोठा दहशतवादी हल्ला

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्फोटात 5 जवान ठार : पोलीस व्हॅन उडवली

Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान गुऊवारी दुपारी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या मोबाईल व्हॅनला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट केला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार करत हाहाकार घडवला. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आणि 2 जण जखमी झाले. जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांनी सुधारित भूसुरूंग स्फोटाद्वारे सुरक्षा दलाचे वाहन उडवून दिले. या स्फोटापूर्वी निवडणुकीच्या एक दिवस आधी, बुधवारी अशांत बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान 30 जण ठार झाले होते.

मतदानावेळी काही ठिकाणी हिंसाचार

पाकिस्तानमध्ये गुऊवारी सकाळी 8 वाजता सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोक मतदान करताना दिसले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो, अशी चर्चा आहे. शरीफ यांच्या पक्षाला लष्कराचा पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. सकाळी सुरू झालेले मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होते. या काळात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्याची नोंद झाली आहे. पाकिस्तानमधील खराब होत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. देशभरातील मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कराची आणि पेशावरसह काही शहरांमध्येही फोन सेवा प्रभावित झाली होती. मतदानाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article