कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोळे जुगार अड्ड्यावर मोठा छापा

12:50 PM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

38 जणांना अटक, बहुतेक व्यक्ती कर्नाटकातील, 16 लाखांची रोकड जप्त : निर्जनस्थळी बंगल्यात चालत होता अड्डा

Advertisement

काणकोण : गोव्याच्या सीमेवरील पोळे येथील एका निर्जनस्थळी असलेल्या जुगार अड्ड्यावर दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा, काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश रा. देसाई आणि अन्य पोलिसांनी छापा टाकून त्यात गुंतलेल्या 38 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडील साधारणपणे 16 लाख 45 हजार रुपये इतकी रोकड जप्त केली. याशिवाय आर्टिका कार, 40 मोबाईल संच, जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या ठिकाणचा हा जुगारी अड्डा मागच्या कित्येक महिन्यांपासून चालू असून त्यात कर्नाटक आणि गोव्यातील काही व्यक्ती गुंतलेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र ते योग्य संधीची वाट पाहत होते. 22 रोजी पहाटे 2.30 च्या दरम्यान पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आणि सर्वांना मुद्देमालासहित अटक केली. यात ज्या व्यक्ती गुंतलेल्या आहेत त्या सर्व शेजारच्या माजाळी, सदाशिवगड, कारवार या कर्नाटकच्या भागातील असून त्यात काही गोव्यातील व्यक्तींचाही हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी निर्जनस्थळी असलेला एक बंगला ताब्यात घेण्यात आला होता, अशी माहिती निरीक्षक हरिश रा. देसाई यांनी दिली.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांची नावे महेंद्र दयानंद नाईक कुमठा, प्रशांत कृष्णा नाईक अवुर्सा, आनंद गणपती नाईक कुमठा, रमेश कृष्णप्पा शिमोगा, सुधाकर नारायण नाईक कुमठा, नागराज नारायण नाईक अंकोला, रॉनी शावियर फर्नांडिस शेळी-काणकोण, नागराज लका नाईक अवुर्सा, राज नागराज शिमोगा, पांडुरंग नील्लप्पा गावडा अंकोला, संतोष गोपाळ कुमठा, सुब्राय शिव गावडा कुमठा, कविराज पांडुरंग नाईक यल्लापूर, विशाल वासुदेल असूलकर यल्लापूर, इर्शाद इसाफ मुल्ला यल्लापूर, गणेश गणपती भट शिर्सी,  नारायण पालगुण नाईक अवुर्सा, नितीन दयानंद पालेकर होन्नावर, परमेश तिमय्या नाईक होन्नावर, अल्लाबक्ष अब्दुल खदार मुंडगोड, विनय देवण्णा नाईक अंकोला, बलराज तुलसी गावडा अंकोला, रवी श्रीकांत शेट्टी अंकोला, गजानंद श्रीकांत फडते कुमठा, संतोष बिडी गावकर अंकोला, मंजुनाथ सुरेश नाईक अवुर्सा, सुरेश अंकप्पा अप्पारनू हावेरी, गौतम रामकृष्ण कामत यल्लापूर, अशोक वेंकरमण शेट यल्लापूर, धनराज पांडुरंग नाईक यल्लापूर, नवीन रामचंद्र नाईक कुमठा, राघवेंद्र रामचंद्र रायकर मुंडगोड, सुनील शशिकांत भोटके यल्लापूर, मुदीन रझाक माथाड कारवार, शांतन मोहंतीश सिद्दी यल्लापूर, मंतेश देमान हरिजन यल्लापूर, मोहम्मद अब्दुल शेख काजुबाग-कारवार अशी असून काणकोणचे निरीक्षक हरिश रा.दसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणात बडी धेंडे गुंतली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यातील बरेच जण राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील असून अटक केलेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. आता त्यांना काणकोणच्या न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे. काणकोण तालुक्यात आतापर्यंत घातलेल्या छाप्यातील हा सर्वांत मोठा छापा असून काणकोणातील काही ठिकाणी असे जे बेकायदेशीर व्यवहार चालतात त्यावर आता पोलिसांनी कडक नजर ठेवण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे या गैरव्यवहारांत ज्या व्यक्ती गुंतल्या आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article