प्राचीन माशाच्या अवशेषातून मोठा शोध
माणसांप्रमाणे असलेल्या जीवांचा शोध घेण्यास वैज्ञानिक उत्सुक असतात. सर्वसाधारणपणे अशाप्रकारचे जीव पृथ्वीवर आढळून येतात. परंतु अनेकदा सागरी जीवाशी माणसाची वैशिष्ट्यो जुळणे अत्यंत रंजक मानले जाते. अलिकडेच झालेल्या एका अध्ययनात एका माशाच्या अवशेषातील हाडांमध्ये असे काही दिसून आले, ज्यामुळे संशोधक दंग झाले. मासांच्या गुडघ्यात आणि कोपरामध्ये ज्याप्रकारे सांधे असतात, तसेच या माशामध्ये आढळून आले आहेत.
या प्राचीन फॉसिल किंवा जीवाश्म अध्ययनातून सांगाड्यांमध्ये लवचकिता आधुनिक काळाच्या प्राण्यांपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले. जबडा नसलेल्या प्राण्यांमध्ये आतापर्यंत अशाप्रकारची संरचना कधीच दिसून आली नव्हती. या नव्या माहितीमुळे कणायुक्त प्राण्यांच्या इतिहासात अत्यंत मोठा बदल करावा लागणार आहे.
सागरी जीवांमध्ये देखील!
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या नीलिमा शर्मा यांची टीम अशाप्रकारचे सांधे अखेर जीवसृष्टीच्या इतिहासात कधीपासून अस्तित्वात आले याचा शोध घेत होती. पीएलओएस बायोलॉजीमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार हे वैशिष्ट्या केवळ जमिनीवरील जीवांमध्येच असल्याचे मानले जात होते. परंतु जुन्या सागरी जीवांमध्येही हे वैशिष्ट्या होते, त्यांचे हात अन् पाय यासारखे अवयव उत्क्रांतीत नाहीसे होण्यापूर्वीच हे घडले हेते असे वैज्ञानिकांना आढळून आले होते.
बोथरियोलेपिस माशाच्या जीवाश्माचे अध्ययन
संशोधकानी बोथरियोलेपिस नावाच्या माशाच्या जीवाश्माचे अध्ययन केले, ज्यात त्याच्या सांगाड्यात असे काही आढळून आले, जे केवळ सिनोविलय सांध्यातच दिसून येते. तर प्रत्यक्षात हा जबडा नसलेला मासा होता. याचमुळे हा मासा देखील तितकाच सहजपणे वळू शकत होता, जसा माणूस स्वत:चे शरीर कोपरा अन् गुडघ्यांच्या मदतीने वळवू शकतो. या अनोख्या वैशिष्ट्याचा वापर करत हा मासा शिकारी जीवांपासून सहजपणे वाचू शकता होता. हा गुण सागरी जीवांनी कशाप्रकारे विकसित केला हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता संशोधक करत आहेत.