मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित मेजर ध्यानचंद चषक आंतरशालेय सिक्स साईड हॉकी स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात झाले. कॅम्प येथील मेजर बी. ए. सय्यद मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे पंच कमिटीचे चेअरमन खालील बेपारी, संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, उपाध्यक्ष साजिद शेख, सचिव साकीब बेपारी, एम. बी. नदाफ, गोपाळ खांडे, इकबाल बॉम्बेवाले, जे. ए. जाहागीरदार, इब्राहिम शेख, श्रीनिवास पाटील, गणपत कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना संघातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. या स्पर्धेत एकूण विविध गटातील मुला मुलींच्या 15 संघानी भाग घेतला आहे. डॉ. गिरीजाशंकर माने, एम.जे. तेरणीकर, शाबास नाईक सुधाकर चाळके आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या सामन्यातून एम. आर. भंडारी, चिंचली, जी. जी. चिटणीस, हेरवाडकर संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. वरील संघांनीपुढील फेरीत प्रवेश केला.