For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बागणी- भडकंबे रस्त्यावर मोठा अपघात; दोघेजण जागीच ठार

10:21 AM Jun 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
बागणी  भडकंबे रस्त्यावर मोठा अपघात  दोघेजण जागीच ठार
Major accident Bagni- Bhadkambe road
Advertisement

आष्टा / वार्ताहर

बागणी- भडकंबे रस्त्यावर समोरून येणाया वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने मोटरसायकलचा ताबा सुटून मोटरसायकल रस्त्याशेजारील कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दोघे ठार तर एक जखमी झाला. सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

Advertisement

संदेश तानाजी सावंत, राहणार सिंधुदुर्ग व बाळासो सूर्यकांत जाधव असे या अपघातात ठार झालेल्या इसमांची नावे असून ओंकार नामदेव कदम हे या अपघातात गंभीर जखमी झाले. याची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत ओंकार नामदेव कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलीस ठाणे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मयत संदेश सावंत, बाळासो जाधव आा†ण ओंकार कदम हे बजाज पल्सर मोटरसायकलवरून नागाव भडकंबे रोडवर नागावच्या पुढे असणाऱ्या ओढ्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश संदेशच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे संदेशचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आा†ण मोटरसायकल ओड्यावरील कठड्याला जाऊन धडकली.

ही धडक एवढी मोठी होती की, या धडकेत मोटरसायकलवरील चालक संदेश सावंत आणि मागे बसलेले बाळासो जाधव जागीच ठार झाले. तर ओंकार कदम हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातात मोटरसायकलच्या पुढील भागाचा चुराडा झाला. तपास आष्टा पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.