महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवडी खुनी हल्लाप्रकरणी मुख्य संशयित गजाआड

03:34 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सावंतवाडी-आंबोली येथून घेतले ताब्यात, म्हापसा पोलीस स्थानकात आणताच देवडी कुटुंबियांनी घेतली धाव,काहीवेळ वातावरण तंग 

Advertisement

म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे अहमद देवडी व संदेश साळकर यांच्या खुनी हल्लाप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित आर.के. उर्फ रामकृष्ण भालेकर याला म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 12 वा. सावंतवाडी आंबोली दरम्यानच्या मार्गावर ताब्यात घेतले. सलग 23 दिवस शोधात असलेल्या म्हापसा पोलिसांनी अखेर आर.के ला अटक केल्यावर सुटकेचा श्वास सोडला. आर.के ला अटक करण्यासाठी पोलिसांवर सर्व स्तरातून दडपण होते, शिवाय मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली होती. अहमदच्या अंत्यसंस्काराला आलेले उपसभापती जोशुआ डिसोझा यांनीही आर.के. ला पोलीस गजाआड करणार असल्याचे आश्वासन देत देवडी कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले होते. दि. 30 मे रोजी गणेशपुरी म्हापसा येथे टाकीजवळ हा खुनी हल्ला झाला होता. त्यात अहमद देवडी व संदेश साळकर हे दोघेही गंभीर जखमी केले होते. त्यात अहमदच्या डोक्यावर अनेक वार केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. सलग 20 दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या अहमदचा बुधवारी मृत्यू झाला.

Advertisement

दरम्यान उपलब्ध माहितीनुसार आर.के. याला काल शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान म्हापसा पोलीस स्थानकावर आणले. घटनेची माहिती देवडी कुटुंबियांना दिल्यावर संध्याकाळी ते म्हापसा पोलीस स्थानकात आले. ते शिवीगाळ करीत संशयित आर.के. च्या अंगावरही धावून गेल्याचा प्रकार घडला. त्यावेळी काही वेळ वातावरण तंग झाले होते. आरकेच्या अटकेबाबत माहिती प्रसार माध्यमांपासून गुप्त ठेवली होती. मात्र ही माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यावर प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी पोलीस स्थानकात दाखल झाले. सायं. 7.30 वाजण्याच्या दरम्यान आर.के. ला वैद्यकीय तपासणीसाठी आझिलो इस्पितळात नेण्यापूर्वी पोलीस स्थानकातील सर्व वीज खंडित केली तसेच आझिलो इस्पितळातून आर.के. ला पाठीमागच्या दरवाजातून आतमध्ये नेण्यात आले व बाहेर काढण्यात आले. दरम्यान याबाबत निरीक्षक निखिल पालयेकर यांना विचारले असता येथे दंगा होऊ नये म्हणून असे करावे लागल्याचे सांगितले. यापूर्वी दोन गुह्यात आर.के.चा समावेश असून आता तो खुनी हल्ल्यात अडकला असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली. म्हापसा पोलिसांनी यापूर्वी एकूण 6 संशयितांना अटक केली असून आता आर.के.ला गजाआड करण्यास यश मिळविले.

आरोपीला जास्तीत जास्त वर्षे कारवासाची शिक्षा व्हावी

दरम्यान अहमद देवडीची पत्नी म्हणाल्या, आर.केला पोलीस अटक करू न करू, आपणास त्याचा काही फरक पडत नाही. आपला पती अहमद आपल्यास सोडून गेला. आपण निराधार झाले, असे सांगत तिला मुख्य आरोपीस अटक केल्याने अहमदचे वडील कैसास व भाभी बरखा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा, नगरसेवक सुधीर कांदोळकर तसेच म्हापसा पोलिसांचे आभार मानले आहेत. संशयित आरोपीला जास्तीत जास्त वर्षे कारावासाची शिक्षा करावी, अशी मागणी अहमदच्या आईने केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article