महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लजच्या मुख्य रस्त्यावरील दिवे मंत्र्यांच्या आदेशानंतर उजळणार

05:16 PM Jan 15, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

दोन दिवसात शहरातील पथदिवे सुरु करण्याचा निर्णय
गडहिंग्लजला झालेल्या बैठकीत चर्चा
गडहिंग्लज

Advertisement

संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गडहिंग्लज शहरातून गेला असून या रस्त्यावर उभारण्यात आलेले पथदिव्यांचे वीजबिल कुणी भरायचे? हा प्रश्न वर्षभर भिजत पडल्याने मुख्य रस्ता आज अखेर अंधारात आहे. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या बैठकीत विचारणा केल्यानंतर आज मुख्याधिकारी यांच्या दालनात तातडीची बैठक घेऊन दोन दिवसात पथदिवे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Advertisement

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गेले वर्षभर जोडून ही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची कुचबना होत आहे. यावर सातत्याने नागरिकांनी प्रश्न विचारूनही उपाय निघाला नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक अधिकाऱ्यांना कोडून घातल्यानंतर गणोशोत्सव सणात जनरेटरच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील पथदिवे प्रकाशमान झाले. त्यानंतर दिवाळीत काही दिवस दिव्यांचा उजेड पडला. तेंव्हापासून आजअखेर मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. पथदिव्यांचे बील भरणार कोण? असा प्रश्न पडला आहे. नगरपालिकेला हे बिल परवडणारे नसल्याने अडचण येत आहे. यावर पालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्र व्यवहार करून ही उपाय निघाला नाही.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापूरात बैठक घेऊन संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गावरील बंद पथदिव्यांची गांभीर्याने दखल घेऊन दोन दिवसात यावर निर्णय घेण्याचे आदेश संबंधिताना दिले आहेत. यानंतर आज मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या दालनात याप्रश्नी तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीला किरण कदम, रामगोंडा पाटील, हारूण सय्यद, शारदा आजरी, सिध्दार्थ बन्ने, उदय परीट, दिपक कुराडे, रफिक पटेल, महेश सलवादे, नरेंद्र भद्रापूर, अमर मांगले, रश्मिराज देसाई, रमजान अत्तार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी या पथदिव्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अनिल पाटील यांनी माहिती देत तातडीने पथदिवे सुरू करण्याबाबत निर्णय घेत असल्याचे सांगितले. नगरपालिकेचे विज अभियंता चव्हाण यांचीही उपस्थिती होती. मुख्याधिकारी ढेकळे यांनी नगरपालिका वीजबिल भरणार असल्याचे स्पष्ट करत वीजबील कमी येण्यासाठी सध्या असणारे बल्ब काही ठिकाणी बदलून कमी वॅटचे बल्ब बसविले जाणार आहेत. उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न विचारून चर्चा घडवून आणली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार करून दिवे सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी ढेकळे यांनी सांगितल्यानंतर बैठक समाप्त झाली.

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर उद्या जोडण्यात येणार आहे. त्यानंतर बसविण्यात येणाऱ्या वीजमीटरचे परीक्षण नगरपालिका आणि महावितरण कंपनीचे अधिकारी करणार आहेत. याला एक दिवस लागेल असा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवसात शहरातील पथदिवे प्रकाशमान होतील असे सांगण्यात आले. पथदिवे प्रकाशमान झाल्यानंतर वीज बिलात बचत करण्यासाठी काही ठिकाणी 250 वॅटचे बल्ब बदलून 140 वॅटचे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article