मेफेटरमाईन प्रकरणी मुख्य वितरकाला बेड्या
मिरज :
मेफेटरमाईन इंजेक्शनचे रॅकेट महाराष्ट्रपासून उत्तरप्रदेशपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशसह कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिह्यात छापासत्र राबवले. नशेच्या इंजेक्शन रॅकेटमधील मुख्य वितरक इंतजार अली जहीऊद्दीन (रा. लखीलपूर, ता. कंठ, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) याला उत्तर प्रदेशमध्ये बेड्या ठोकल्या. याशिवाय अन्य तिघा एजंटांनाही अटक केली. या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या 13 झाली असून, सर्व संशयीतांकडून सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिह्यात नशेच्या इंजेक्शन विक्रीचे रॅकेट चालविले जात असल्याचे समोर आले आहे.
नशेचे इंजेक्शन अर्थात मेफेटरमाईन विक्री प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी कारवाई करत सांगली-मिरजेतील इंजेक्शन तस्करी उघडकीस आणली. या प्रकरणात सुरूवातील तीन संशयीतांना अटक केली होती. संशयीतांची पोलिस कोठडी वाढवून कौशल्यपूर्ण तपास करत इंजेक्शन तस्करीची साखळीच चव्हाट्यावर आली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात सहाजणांना अटक केली. यातून नशेसाठी वापरले जाणारे एक हजार, 507 इंजेक्शन व गोळ्या असा 14 लाख, 46 हजार, 641 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला. इंजेक्शन रॅकेटमधील मुख्य वितरकाला पकडण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
पोलिसांनी खोलवर तपास कऊन मुख्य वितरकासह अन्य तिघांची नांवे निष्पन्न केली. इंजेक्शन रॅकेटचा मास्टरमाईंड उत्तरप्रदेशमधील असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापासत्र राबवत इंतजार अली जहीऊद्दीन याला गजाआड केले. याशिवाय आकाश अंकुश भोसले (वय 23, रा. बिजवडी, जि. सातारा), हणमंत पांडूरंग शिंदे (वय 24, रा. दसूर ता. माळशिरस) आणि ललीत सुभाष पाटील (वय 23, रा. सऊंड, ता. शाहूवाडी) अशा तिघा एजंटांनाही अटक करण्यात आली.
नशेच्या इंजेक्शन प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. यातील इंतजार अली हा मुख्य वितरक आहे. तर अन्य संशयीत हे संबंधीताकडून इंजेक्शन घेउढन सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिह्यात इंजेक्शन विक्री रॅकेट चालवित असल्याचे समोर आले आहे. सदर साखळी वितरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत मेफेटरमाईन रॅकेट पसरले असून, राज्यभरात सदरचे इंजेक्शन वितरण करणारे मोठे सिंडीकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
- आरोपींची संख्या 13 वर
आत्तापर्यंत अटक केलेल्या अन्य संशयीतांमध्ये मुख्य वितरक इंतजार अली जहीऊद्दीनसह वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, ऋतुराज आबासाहेब भोसले, अमोल सर्जेराव मगर, साईनाथ सचिन वाघमारे, अविनाश पोपट काळे, देवीदास शिवाजी घोडके, रोहित अशोक कागवाडे, ओंकार रविंद्र मुळे, मेडीकल चालक अशपाक बशिर पटवेगार, आकाश अंकुश भोसले, हणमंत पांडूरंग शिंदे आणि ललीत सुभाष पाटील अशा 13 आरोपींना गजाआड केले आहे. माहितीचा स्त्राsत असलेल्या संशयीतांच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून, या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.