माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सज्ज
5 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार : शंभर टक्के प्लेसमेंटची ग्वाही
बेळगाव : देशभरात वाढत चाललेल्या पर्यटन क्षेत्राला व पंचतारांकित हॉटेलांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सावंतवाडीनजीकची मळगावमधील माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सज्ज झाली आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून 5 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. मळगावमधील साडेतीन एकराहून अधिक जागेत वसलेल्या निसर्गरम्य परिसरातील हे कॉलेज विद्यार्थ्यांना हॉटेल व हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे धडे देणार आहे. हे कॉलेज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या ‘नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी’ (दिल्ली) यांच्याशी संलग्न असून त्याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. या कॉलेजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयु, दिल्ली) पदवी मिळणार आहे.
शंभर टक्के प्लेसमेंट
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात शंभर टक्के प्लेसमेंट मिळेल, अशी ग्वाही कॉलेज व्यवस्थापनाने दिली आहे. देशातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड्स व कॉलेज व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य करार असल्याने विद्यार्थ्यांना या ब्रँड्सच्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटद्वारे पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधीही मिळेल.
अनेक देशांमध्ये काम करण्याची संधी
कॉलेजने काही आंतरराष्ट्रीय करारही केले असून त्यामार्फत मॉरिशस, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, दुबई या देशांमध्येही विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल. यासाठी संस्थेतील तज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारची तयारी करून घेणार आहेत. याशिवाय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निवासासाठी उत्तम हॉस्टेलची व्यवस्था असून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या हॉस्टेलमुळे विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे. या संस्थेमध्ये बीएस्सी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमा ईन फूड प्रॉडक्शन, डिप्लोमा ईन हाऊसकिपिंग, अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेशन ईन हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स, सर्टिफिकेट ईन फूड प्रॉडक्शन आणि पेटिसरी, सर्टिफिकेट ईन फूड आणि ब्रेव्हरेज सर्व्हिस, सर्टिफिकेट ईन हाऊसकिपिंग या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येईल. इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असून 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.maiihm.in या वेबसाईटवर, 9373021616 या क्रमांकावर किंवा admission@maiihm.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजने केले आहे.