For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपतिपदासाठी महिंदा राजपक्षेंचा पुत्र रिंगणात

06:39 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपतिपदासाठी महिंदा राजपक्षेंचा पुत्र रिंगणात
Advertisement

श्रीलंकेत लवकरच राष्ट्रपती निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

श्रीलंकेत राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. श्रीलंका पोडुजाना पेरामुना (एसएलपीपी) या पक्षाने महिंदा राजपक्षे यांचे पुत्र 38 वर्षीय नमल राजपक्षे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी महिंदा हे 2005-15 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती राहिले आहेत. राजपक्षे यांच्या पक्षाच्या 100 हून अधिक खासदारांनी रानिल विक्रमसिंघे यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दर्शविला असताना नमल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

नमल यांच्या एंट्रीमुळे राष्ट्रपती निवडणुकीला आता चौकोनी स्वरुप प्राप्त झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नमल राजपक्षे यांच्यासोबत रानिल विक्रमसिंघे, मुख्य विरोधी पक्षनेते प्रेमदासा आणि मार्क्सवादी जेव्हीपी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांचा समावेश आहे.

गोटाबाया राजपक्षे यांचा उर्वरित कार्यकाळ सांभाळण्यासाठी राजपक्षे कुटुंबाने रानिल विक्रमसिंघे यांना समर्थन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एप्रिल 2022 मध्ये श्रीलंका हा देश दिवाळखोर ठरला होता. देशात महागाई तसेच अन्य कारणांमुळे गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. यामुळे गोटाबाया यांना राष्ट्रपतिपद सोडावे लागले होते.

Advertisement
Tags :

.