राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत माहेश्वरी शाळेला यश
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक पॅरा जलतरण संघाटना आयोजित राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत माहेश्वरी अंध शाळेच्या 14 जलतरणपटूंनी भाग घेवून 20 सुवर्ण, 13 रौप्य पदकासह एकूण 39 पदकांची कमाई केली. या विजेत्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. सदर स्पर्धेत 50, 100 व 200 मी. फ्रिस्टाईल, 50, 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात भाग घेवून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. गोवा-पणजी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी माहेश्वरी अंध शाळेच्या 12 जलतरणपटूंची कर्नाटक पॅरा संघात निवड झाली असून हा संघ 19 ते 22 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोव्याला रवाना होणार आहे. या सर्व जलतरणपटूंना स्वीमर्स क्लबचे प्रशिक्षक उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल माहेश्वरी अंध संस्थेचे अध्यक्ष वाधीराज कलघटगी, चिंतामणी ग्रामोपाध्याय, मुख्याध्यापिका अनिता गावडे व इतर शिक्षकवर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. तर सुरेश मादिगर, मल्लाप्पा यांचे या खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.