For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माहेश्वरी चौहानचे ऑलिम्पिक तिकिट निश्चित

06:34 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
माहेश्वरी चौहानचे ऑलिम्पिक तिकिट निश्चित
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डोहा येथे झालेल्या आयएसएसएफ ऑलिम्पिक पात्रता चॅम्पियनशिप शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज माहेश्वरी चौहानने महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात रौप्यपदक मिळवून येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट आरक्षित केले आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोटा पद्धतीनुसार स्थान मिळविणारी माहेश्वरी चौहान ही भारताची 21 वी नेमबाजा आहे.

महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारातील अंतिम लढतीत चिलीच्या फ्रांसिस्का क्रोव्हेटोने माहेश्वरी चौहानचा 4-3 असा निसटता पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या पराभवामुळे माहेश्वरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या पात्र फेरीच्या स्पर्धेत आपली कामगिरी समाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया माहेश्वरीने व्यक्त केली आहे. चिलीच्या क्रोव्हेटोने यापूर्वीच झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.