For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माहेश्वरी अंधशाळेच्या खेळाडूंचे जलतरण स्पर्धेत यश

10:10 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
माहेश्वरी अंधशाळेच्या खेळाडूंचे जलतरण स्पर्धेत यश
Advertisement

राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत 15 पदकांची कमाई

Advertisement

बेळगाव : मध्य प्रदेश येथील ग्वालियर येथे  झालेल्या राष्ट्रीय पॅरा ऑलम्पिक जलतरण स्पर्धेत  बेळगावच्या माहेश्वरी अंध शाळेच्या खेळाडूंनी 9 सुवर्ण, 3 रौप्य व 2 काश्य पदक एकूण 15 पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. मध्य प्रदेश येथील ग्वालियर येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेत पृथ्वी नारळेकरने 3 सुवर्ण, सोनम पाटीलने सुवर्ण, साक्षी पाटीलने 2 सुवर्ण व एक रौप्य, बसवराज माळीने 1 सुवर्ण, प्रज्वल नारळेकरने 1 रौप्य, 2 कांस्य, रम्या लमाणीने 1 कांस्य, चिन्मय क्यामन्नवर 1 कांस्य पदके पटकाविली. याविजेत्या खेळाडूंना बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्थेचे अध्यक्ष वादीराज कलघटगी, चिंतामणी ग्रामोपाध्ये, मुख्याध्यापिका अनिता गावडे, महिला बालकल्याण खात्याचे उपनिर्देशक नागराज आर., जिल्हा अंधविकल अधिकारी नामदेव बिलकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. या खेळाडूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुरेश मादीगर, के. मल्लाप्पा, रेणुका तलवार यांचे मार्गदशंन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.