For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. आंबेडकर श्री चा मानकरी महेश गवळी

11:06 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॉ  आंबेडकर श्री चा मानकरी महेश गवळी
Advertisement

बेळगाव : नुकत्याच गुलबर्गा येथील जगत पार्क लुंबीनी चौक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्री स्पर्धेत बेळगावच्या महेश गवळींनी आंबेडकर श्री हा मानाचा किताब मिळविला. तसेच बेळगावच्याच विनोद मेत्रीने बेस्ट पोझरचा किताब मिळविला. सदर स्पर्धेमध्ये राज्यातून 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा कार्याध्यक्ष एस. एस. तावडे, सुरेश शर्मा, नगरसेवक राजू कपनूर, तनवीर (बिदर), दिगंबर बेळमगी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये पंच म्हणून राष्ट्रीय पंच अनिल अंब्रोळे, राजेश लोहार, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, संतोष सुतार, स्टेज मार्शल श्रीधर बरटक्के यांनी काम पहिले.

Advertisement

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे...

  • 55 किलो गट: 1)ओमकार गवस-बेळगाव , 2) राजकुमार दुरुगुडे-बेळगाव, 3) भरत शिंदे-गुलबर्गा, 4) मानस कुमार-बेळ्ळारी, 5) प्रथमेश हुलजी-बेळगाव
  • 60 किलो गट : 1) रोनक गवस-बेळगाव, 2) साईनाथ नार्वेकर-बेळगाव, 3) एमडी तुकाराम-गुलबर्गा, 4) सुजल वालीकर-गुलबर्गा, 5) संदीप कुमार-बळ्ळारी
  • 65 किलो गट : 1) विनोद मेत्री-बेळगाव, 2) उमेश गंठाने-बेळगाव, 3) श्रीधर हंडे-बेळगाव, 4) रोहन आलुर-बेळगाव, 5) एमडी सोहेल-गुलबर्गा
  • 70 किलो गट : 1) चांद शेख-गुलबर्गा, 2) राजकुमार पाटील-गुलबर्गा, 3) तेजर जाधव-बेळगाव, 4) नागराज टी.-गुलबर्गा, 5) शिवकुमार-रायचूर
  • 75 किलो गट : 1) अफरोज ताशिलदार-बेळगाव, 2) संकेत सुरूतेकर-बेळगाव, 3) शिवकुमार झालकी-गुलबर्गा, 4) एम. डी. आलीम-गुलबर्गा, 5) गींग्याप्पा हायालकर-गुलबर्गा
  • 80 किलो गट : 1) महेश गवळी-बेळगाव, 2) गजानन काकतीकर-बेळगाव, 3) एन. भरत-रायचूर, 4) श्रीनाथ तेजम-बेळगाव, 5)जोतिर्लिंग गोदे-गुलबर्गा
Advertisement
Advertisement
Tags :

.