महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रात महायुती, झारखंडमध्ये भाजप?

06:59 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक्झिट पोल अंदाजात ‘रालोआ’चे पारडे जड : झारखंडमध्ये ‘झामुमो’ला धक्का मिळण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, मुंबई, रांची

Advertisement

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील 38 विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी मतदानोत्तर अंदाज म्हणजेच एक्झिट पोल जाहीर केले. या अंदाजांनुसार महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्ता काबीज करण्याचे संकेत मिळत आहेत. तर, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वातील ‘झामुमो’ सरकारला पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो. बहुतांश संस्थांनी झारखंडमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

झारखंडमध्ये एकूण 81 जागा असून 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 42 जागांवर मतदान झाले. तर उर्वरित 38 जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघातही एकाच टप्प्यात बुधवारी मतदान झाली. दोन्ही राज्यांमधील मतमोजणी येत्या शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्या दिवशी सायंकाळपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सर्व जागांवरील प्रारंभीचे कल दुपारपर्यंत स्पष्ट होतील.

महाराष्ट्रात 7 एक्झिट पोल आले आहेत. यापैकी सहा जणांनी भाजप आघाडीचे म्हणजेच महायुतीचे सरकार, तर एका संस्थेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. तसेच झारखंडमधील 4 एक्झिट पोलपैकी सर्वांनी भाजप आघाडीला बहुमत मिळण्याची अपेक्षा वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील ‘पोल डायरी’च्या एक्झिट पोलच्या अंदाजात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. ‘पोल डायरी’नुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला 122-186 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 69-121 जागा मिळत आहेत. ‘पीएमएआरक्यू’च्या सर्वेक्षणातही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून आले आहे. महायुतीला 137-157 तर महाविकास आघाडीला 126-146 जागा मिळू शकतात. ‘मॅट्रीस’च्या ताज्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला स्पष्ट विजय मिळताना दिसत आहे. त्यानुसार 288 सदस्यीय विधानसभेत महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडी 110 ते 130 जागांवर विजयी होण्याची अपेक्षा आहे. बहुतांश वाहिन्यांनी महायुतीला पसंती दर्शवली असली तरी ‘एसएएस’च्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 147-155 जागा आणि महायुतीला 127-135 जागा मिळाल्या आहेत. तर अन्य पक्षांना 10-13 जागांचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

‘चाणक्य’चीही महायुतीलाच पसंती

चाणक्मय एक्झिट पोलने महाराष्ट्रात महायुतीच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीसाठी जोरदार कामगिरीचा अंदाज वर्तवला असून महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्मयता आहे. तर विरोधी महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच अन्य पक्ष आणि अपक्षांना 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज असल्यामुळे अंतिम निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही आघाड्यांमध्ये 10-15 जागांचा फरक असल्याने निकराची लढत दिसून येते.

झारखंडमध्ये भाजप युतीचे सरकार

झारखंडमधील 81 जागांपैकी चाणक्मय रणनीतीनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 45-50 जागा मिळू शकतात, तर जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 35-38 जागा मिळू शकतात. एक्झिस माय इंडियाने झारखंडच्या बाबतीत पूर्णपणे उलट परिणाम दिले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 53 जागा मिळू शकतात तर भाजप आघाडीला 25 जागा मिळू शकतात. इतरांना 3 जागा मिळू शकतात. ‘मॅट्रीस’च्या अंदाजानुसार, 81 सदस्यांच्या विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 42 ते 47 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर सत्ताधारी जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 25 ते 30 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

‘टाईम्स नाऊ’ने झारखंडसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये निकराची स्पर्धा दर्शविली आहे. भाजपप्रणित युतीला 40 ते 44 जागा मिळतील, तर जेएमएम आघाडीला 30 ते 40 जागा मिळतील असा अंदाज आहे. ‘पीपल्स पल्स’च्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला झारखंडमध्ये पुन्हा सत्ता मिळू शकते. 81 सदस्यीय विधानसभेत 41 जागांवर बहुमत असलेल्या एनडीएला 44 ते 53 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 25 ते 37 जागा मिळण्याची शक्मयता आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबतचे अंदाजही काहींनी व्यक्त केले आहेत. ‘जेव्हीसी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 32.6 टक्के लोकांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. त्याचवेळी 22.1 टक्के लोकांना उद्धव ठाकरे, 18.7 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस आणि 7.2 टक्के लोकांना नाना पटोले मुख्यमंत्री व्हायला हवेत असे वाटते.

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत लढत

महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती (भाजप, शिंदे गट, अजित गट) आणि विरोधी एमव्हीए आघाडी (उद्धव गट, शरद पवार गट आणि काँग्रेस) यांच्यात लढत आहे. महायुतीतीत भाजप 149, शिवसेना 81 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने 101 जागांवर, शिवसेनेने (उबाठा) 95 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्राच्या लढाईत बहुजन समाज पक्ष आणि एआयएमआयएमसह छोटे पक्षही रिंगणात आहेत. बसपने 237 तर एमआयएमने 17 उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शंभरहून अधिक उमेदवार देत प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. राज्यात 288 जागांसाठी 4,136 उमेदवार रिंगणात आहेत.

एक्झिट  पोल अंदाज महाराष्ट्र विधानसभा

एकूण जागा 288                               बहुमत 145

एजन्सी / संस्था                 महायुती                         महाविकास आघाडी                        अन्य

न्यूज 18-मॅट्रीस                      150-170                           110-130                                8-10

पी-एमएआरक्यु                    137-157                               126-146                               2-8

चाणक्य                                152-160                                130-138                               6-8

पीपल्स पल्स                            175-195                                85-112                                7-12

पोल डायरी                                122-186                               69-121                             12-29

रिपब्लिक                                  137-157                               126-146                               2-8

इलेक्टोरल एज  1                                18                                      150                                20

सरासरी                                              153                                      124                        11

झारखंड विधानसभा

एकूण जागा 81              बहुमत 41

एजन्सी / संस्था                       रालोआ                  इंडिया आघाडी   अन्य

न्यूज 18-मॅट्रीस                      42-47 25-30                    1-4

पीपल्स पल्स                          44-53   25-37                    5-9

चाणक्य                                45-50    35-38                    3-5

जेव्हीसी                                40-44  30-40                       1

सरासरी                                  46        32                           3

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article