महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कबुलायतदार जमिनीचा प्रश्न मिटवून महायुतीने इतिहास घडवला - शिवराम दळवी

05:47 PM Oct 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी.

Advertisement

आंबोली चौकूळ गेळे या तीन गावचा जमीन प्रश्न संपुष्टात आणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक नवा इतिहास घडवला आहे. गेली पंचवीस वर्षे हा प्रश्न रेंगाळला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या तत्परतेने हा प्रश्न कायमचा संपुष्टात आणला. त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. या भागात पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर एक हॉटेल इंडस्ट्रीच्या दृष्टीने आंबोलीला नेण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रश्न सुटल्यामुळे हा भाग पर्यटन दृष्ट्या आणि विकासात्मक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत. सन 1999 पासून हा प्रश्न रेंगाळलेला आहे या भागातील सर्व जनतेने आणि समितीने हा प्रश्न सुटावा म्हणून लढा दिला. त्यांच्या लढ्याला यश आले आहे. त्यांचेही विशेष कौतुक. अशा शब्दात माजी आमदार शिवराम दळवी यांनी स्पष्ट केले .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update #
Next Article