काँग्रेसचे उद्या नागपूरात महायात्रा! 2024 च्या निवडणूकांसाठी नारळ फोडणार
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा शुभारंभ उद्या नागपूर मधील महारॅलीने होणार आहे. है तयार हम...असे घोषवाक्य असलेल्य़ा या महारॅलीसाठी केंद्रीय नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाध्यक्ष नेते मल्लिकार्जून खरगे, यांच्यासह सोनिया गांधी आणि राहूल गांधी हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत. या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस 2024 च्या प्रचाराचा शुभारंभ ही करणार आहे.
2024 च्या लोकसभेच्य़ा निवडणुकांसाठी काही महिनेच शिल्लक असताना भाजपसह अनेक राजकिय पक्ष सक्रिय झाले आहेत. या निवडणूकांसाठी काँग्रेसकडूनही जोरदार तयारी होत असून त्याचा शुभारंभ नागपूरमध्ये होणाऱ्या महाऱॅलीच्या माध्यमातून होत आहे.
2024 साठीच्या लोकसभेसाठी है तयार हम...असे म्हणत काँग्रेसने नागपूरामध्ये महारॅलीचे आयोजन केले आहे. उद्या होणाऱ्या या महायात्रेसाठी काँग्रेसचे राष्ट्रिय नेर्तृत्व हजर राहणार असून यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहूल गांधी आणि प्रियंका गांधी हजर राहणार आहेत. त्याचबरोबर तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
या बाबत माहीती देताना काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी है तय्यार हम...म्हणजेच आम्ही तयार आहोत. असे म्हणत या महारॅलीसाठी सुमारे 200, 000 लोक उपस्थित राहतील असा दावा केलाा आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) चा वैचारिक मार्तृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे मुख्यालय सुद्धा नागपुरात असल्याने या महारॅलीसाठी नागपूरची निवड केली आहे. तसेच काँग्रेसने रोजगार निर्माण करण्याचा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा संकल्प केला असून लोकांचा लोकशाहीवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल, असेही नाना पटोले म्हणाले.