महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थकबाकीदारांसाठी महावितरणची ‘अभय’ योजना

05:54 PM Dec 19, 2024 IST | Radhika Patil
Mahavitaran's 'Abhay' scheme for defaulters
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ 14 दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील 23 हजार 779 लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामधील 20 हजार 546 वीजग्राहकांनी 30 कोटी 20 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. याची मुदत येत्या 31 डिसेंबरला संपणार आहे.

Advertisement

थकीत वीजबिलांमुळे 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100 टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी 5 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.

पुणे विभागात 30 कोटी 20 लाखांचा मूळ थकबाकीचा भरणा

अभय योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत सहभागी 20 हजार 546 वीजग्राहकांनी 30 कोटी 20 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिह्यात 8626 ग्राहकांनी 18 कोटी 76 लाख, सातारा जिह्यात 994 ग्राहकांनी 1 कोटी 51 लाख, सोलापूर जिह्यात 3328 ग्राहकांनी 2 कोटी 88 लाख, कोल्हापूर जिह्यात 4043 ग्राहकांनी 4 कोटी 74 लाख आणि सांगली जिह्यातील 3555 ग्राहकांनी 2 कोटी 31 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत असणाऱ्या ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, पण त्या जागेवर वीजबिलांची थकबाकी राहणार असल्यामुळे या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. त्यामुळेच सध्या विजेची गरज नसतानाही 11 हजार 657 ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. तर 7920 ग्राहकांनी पुनर्विजजोडणी आणि 4202 ग्राहकांनी नवीन वीज जोडणीची मागणी केली आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या इतरही ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे. महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.स्aप्adग्sम्दस्.ग्ह ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article