महापुराच्या पाण्यातून विद्यूत वितरण कर्मचाऱ्यांनी पार पाडली जबाबदारी
पुलाची शिरोली / वार्ताहर
वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महापुराच्या पाण्यात जाऊन पुलाची शिरोलीतील विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे शिरोली ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
गेल्या, चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे पंचगंगा नदी शेजारील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे मंगळवारी रात्री गावातील कांही भागात विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे अंधार पसरला होता. याची विज जोडणी प्रधान-तंत्रज्ञ अशोक कोळी यांनी बुधवारी सकाळी तत्काळ दखल घेतली. व आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून अन्य कर्मचाऱ्यांच्या साह्याने पुराच्या पाण्यातून जाऊन विद्युत पुरवठा अन्य मार्गाकडून सुरू केला. या त्यांच्या धाडसी कार्याबद्दल शिरोली ग्रामस्थांच्यातून कौतुक होत आहे.