वीरसौधमध्ये महात्मा गांधी पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
कार्यक्रमाला मंत्रिगण-अधिकाऱ्यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेत बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त शहरात गुऊवार दि.26 पासून कार्यक्रमांना सुऊवात झाली आहे. टिळकवाडीतील वीरसौध येथे महात्मा गांधींच्या नूतन पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वीरसौधच्या आवारातील गांधी स्मारकातील नूतन छायाचित्र दालनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वीरसौध आवारात रोपटी लावली.
मंत्री एच. के. पाटील, एम. बी.पाटील, एच. सी. महादेवप्पा, महिला व बालकल्याण खात्याच्या लक्ष्मी हेब्बाळकर, शरणबसप्पा दर्शनापूर, के.एच. मुनियप्पा, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विधान परिषद सदस्य नागराजू यादव, माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, राज्य सरकारचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, बेळगाव महानगर विकास प्राधिकरण (बुडा) अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माहिती खात्याच्या सचिव कावेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे सहसंचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.