कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कडोलीतील महाशिवरात्री यात्रा महोत्सव उत्साहात

10:45 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कडोली 

Advertisement

‘हर हर महादेव, श्री दुरदुंडेश्वर महाराज की जय’च्या गजरात येथील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठात महाशिवरात्र यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम झाले. महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सालाबादप्रमाणे येथील जागृत देवस्थान श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाचे अरभावी-कडोली मठाचे मठाधीश पुज्य श्री गुरुबसवलिंग महास्वामीजी यांच्या सान्निध्यात गेले दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कडोली पंचक्रोशीत अत्यंत जागृत देवस्थान परिचित असलेल्या या यात्रा महोत्सवात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी, युवा नेता राहूल जारकीहोळी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,

Advertisement

हेस्कॉमचे अधिकारी गुरुसिद्ध नायक, सतीश नायक, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बसवंत मायाण्णाचे, गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या महोत्सवात मुलांचे सांस्कृतिक आणि प्रतिभा कार्यक्रम म. नि. प्र. शिवबसव स्वामीजी (हुक्केरी मठ) या सान्निध्यात पार पडला. यावेळी डॉ. ए. एल. पाटील, काकती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंगी, अगसगा ग्रा.पं. अध्यक्ष अमृत मुद्दण्णावर, बाबुराव गौंडवाडकर, प्रगतशील शेतकरी दोडगौडा शंकरगौडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री दुरदुंडेश्वर इंग्लिश मीडीयम शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थीनींचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले. गुरुवारी सकाळी श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठात देवालयाला महारूद्राभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विविध वाद्यांच्या गजरात गावात पालखी महोत्सव आणि दुपारी धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.

अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

महाशिवरात्र यात्रा महोत्सवाच्या सांगता समारंभात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कडोली पंचक्रोशीतील शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी सद्भक्त कलगौडा पाटील, कलाप्पा शिंगे, ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा, कृषी पत्तीन संघाचे चेअरमन गजानन पाटील, राजू पाटील, अगसगा ग्रामस्थ, कडोली देवस्थान पंच कमिटी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विविध गावच्या भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article