महाशिवरात्रीची महाप्रसादाने उत्साहात सांगता
हजारो भक्तांनी घेतला लाभ : विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : शहर परिसरात गुरुवारी महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली. या निमित्ताने पहाटेपासून अभिषेक, महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध मंदिरांतून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. बुधवारी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. गुरुवारी महाप्रसादाने या दोन दिवशीय कार्यक्रमाची सांगता झाली.
शिवमंदिर, वडगाव
वडगाव येथील शिवमंदिरात गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. सकाळी मंदिरात अभिषेक, आरती आणि तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, भक्त उपस्थित होते. शिवाय मंदिर परिसरात आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी प्रसादासाठी गर्दी केली होती. विशेषत: दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक विधी आणि पूजा झाली. शिवाय दर्शनासाठीही मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या.
शनिवार खूट, महादेव आर्केड
शनिवार खूट येथील महादेव आर्केडमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी व्यावसायिक आणि नागरिकांनी याचा लाभ घेतला. याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रम झाले.