Solapur : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्तांसाठी सामाजिक भान ! महर्षी विवेकानंद संस्थेकडून 11 लाखांची मदत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या भावनेतून महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून 11 लाख रुपयांचा धनादेश सीएम फंडासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर मुंबई विमान सेवेचा प्रारंभकरण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सोलापूर येथे आले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, संचालक नितीन बिज्जरगी, विलास कोरे, विक्रम शिंदे, मिलन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अक्कलकोट, सेमी इंग्लिश विभाग, अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हन्नूर, मातोश्री गुरुबसब्बा कल्याणशेट्टी महाविद्यालय अक्कलकोट येथील शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच स्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्थेचे व मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून दिल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील सर्व शिक्षकांनी कृतज्ञता भावनेने अतिवृष्टी भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून दिलेली रक्कम लाखमोलाची आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.