शहरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात
बेळगाव : शहर परिसरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जि. पं., महापालिका, जिल्हा अनुसूचित वर्ग कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आमदार असिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, राजशेखर तळवार आदींनी महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करून प्रतिमा पूजन केले. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध कलाकारांसह झांजपथक, ढोलवादक आदी सहभागी झाले. विविध वेशभूषा करून कलाकार कला सादर करत होते. कला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केले होती. या मिरवणुकीला किल्ला तलावापासून सुरुवात होऊन कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात समारोप झाला. रंगमंदिरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.