For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेलो इंडियात महाराष्ट्राचे महिलाराज

06:29 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
खेलो इंडियात महाराष्ट्राचे महिलाराज
Advertisement

5 वी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, राजस्थान : आदिती, गीतांजलीला सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/  जयपूर 

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील पाचव्या पर्वात महाराष्ट्राच्या मुलींची मत्तेदारी दिसून आली. अपेक्षेप्रमाणे आर्चरीत विश्वविजेत्या आदिती स्वामीने सोनेरी वेध घेत घेतला. वेटलिफ्टिंगमध्ये गीतांजली जगदाळेने सुवर्ण, वैष्णवी पवारने रौप्य पदक पटकावले. हमालाची मुलगी असणाऱ्या भक्ती वाडकरने 4 पदकाची लयलूट केली आहे तर घरात कुस्तीचा वारसा असणाऱ्या संस्कृती पाटीलने ज्युदोत कांस्य पदकाची कमाई करीत दिवस गाजविला.

Advertisement

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुणे, शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. या यशात महाराष्ट्राची मुलींनी पदकाची बाजी मारली आहे.  शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना अपेक्षेप्रमाणे आदिती स्वामीने कंपाऊंड महिला वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक अंतिम फेरीत 19 वर्षीय अदितीने लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या तनिपर्ती चिकिथाला 147-143 असा पराभव करून आपली हुकुमत दाखवून दिली. वेटलिफ्टिंगमधील 63 किलो वजन गटात 167 किलो वजन उचलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गीतांजली जगदाळे हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात बी. कॉमचे शिक्षण घेत असलेल्या गीतांजलीचे खेलो इंडिया स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

जलतरणातही महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिक्षा यादवने 1500 मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, 200 मीटर फ्रीस्टाईल, 800 मीटर फ्रीस्टाईल व मिडले रिले शर्यतीत कांस्य अशी पाच पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भक्ती वाडकरनेही 1 रौप्य 3 कांस्यपदकाचा चौकार झळकविला. तिचे वडिल राहूल वाडकर हे कोल्हापूरमधील राधरनगरी शासकीय धान्य गोदाम या हमालाची नोकरी करीत असहेत. भक्तीने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रूपेरी यश संपादन केल्यानंतर 200 मीटर बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल व मिडले रिले शर्यतीत कांस्य पदकाची कमाई केली. शासनाच्या पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी ती कसून सराव करीत असते. गत आसामधील स्पर्धेत 1 सुवर्ण 3 रौप्य 1 कांस्य अशी पाच पदकाची कमाई भक्तीने केली होती.

वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवीचा धडाका

आहिल्यानगरमधील भाजीपाला विक्रेत्याची मुलगी असणाऱ्या वैष्णवी संतोष पवारने वेटलिफ्टिंगमधील 80 किलो वजन गटात रूपेरी पदकाचा करिश्मा घडविला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळणाऱ्या वैष्णवीने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकले आहे. गत आसाम स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावले होते. कोल्हापूरतील शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृती पाटीलने ज्युदोतील  महिलांच्या 78 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. कोल्हापूरतील कोतोली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांची संस्कृती ही कन्या असून तिचे आजोबा मारुती पाटील व चुलते अरूण पाटील  कुस्तीगीर होते. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत ती सराव करत असते. घरात कुस्तीचा वारसा असताना तिने कुस्ती सोडल्यानंतर ज्युदो खेळात चकमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे.

Advertisement
Tags :

.