कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राची जलतरणात पदक‘अष्टमी’

06:22 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गया :

Advertisement

महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिचा सलग दुसऱ्या दिवशी 7 व्या खेलो इंडिया स्पर्धेत डंका बघायला मिळाला. तिने सुवर्ण पदकांच्या हॅटट्रिकसह स्पर्धेत 5 पदकांचा पराक्रम केला. जलतरणात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी पदकांची अष्टमी साजरी केली.

Advertisement

गया शहरातील बीआयपीएआरडीच्या जलतरणात तलावाचा परिसरात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. 400 मीटर फ्री स्टाईल व 100 मीटर बटरफ्लाय व रिले  प्रकारात मुंबईच्या आदितीने 3 सुवर्णपदके जिंकून आपली हुकुमत गाजविली.  रिले संघाने सुवर्ण, समृध्दी जाधव व अथर्वराज पाटीलने रौप्य, अर्णव कडू, श्लोक खोपडे व झारा बक्षीने कांस्य पदकांची कमाई करून दिवस गाजविला.

आदिती हेगडेने 400 मीटर फ्रीस्टाईल शर्यत 4.32.87 वेळेत पूर्ण करीत सुवर्ण कामगिरी केली. दिल्लीच्या तितिक्षा रावतला रौप्य तर कर्नाटकच्या श्री चरणीला कांस्य पदक मिळाली. अपेक्षेप्रमाणे 100 मीटर बटरफ्लाय प्रकारातही अव्व्वल स्थान गाठून आदितीने बाजी मारली. सुरूवातीपासून आघाडी घेत 1.04.73 वेळेत शर्यत जिंकून स्पर्धेतील चौथ्या पदकावर तीने शिक्कामोर्तब केला. कर्नाटकची सुहासिनी घोश हिने रौप्यपदक जिंकले, तर महाराष्ट्राची झारा बक्षी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

मुलींच्या 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या समृद्धी जाधव हिने 2 मिनिटे 49.21 सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या श्रीनिथी नाटेसन हिने 2 मिनिटे 44.41 सेंकद वेळ नोंदवित सुवर्णपदकावर कब्जा केला, तर बंगालच्या पृथा देबनाथ हिला 2 मिनिटे 49.95 सेंकद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या दीड हजार मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटीलला 16 मिनिटे 38.36 सेंकद वेळेसह रौप्यपदक मिळाले. आंध्र प्रदेशच्या गोट्टीटी यादवने 16 मिनिटे 30.57 सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर छत्तीसगढच्या पार्थ श्रीवास्तवला 16 मिनिटे 52.69 सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले. मुलांच्या 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात श्लोक खोपडे याने 2 मिनिटे 25.53 सेंकद वेळ नोंदवित महाराष्ट्राल कांस्यपदक जिंकून दिले. कर्नाटकच्या सूर्या झोयप्पा याने 2 मिनिटे 24.55 सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर त्याचाच राज्य सहकारी क्रिश सूकुमारने 2 मिनिटे 25.06 सेंकद वेळेसह रूपेरी यश संपादन केले.

मुलांच्या 400 मीटर मेडले प्रकारात महाराष्ट्रच्या अर्नव कडू याने 4 मिनिटे 44.74 सेंकद वेळेसह कांस्यपदकावर मोहर उमटवली. तेलंगनाच्या वर्षिथ धुलीपुडी याने 4 मिनिटे 38.39 सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. आंध्र प्रदेशच्या मोंगम सामदेवला 4 मिनिटे 38.87 सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या फ्रीस्टाईल रिलेत सुवर्ण

आदिती हेगडे, सारा बक्षी, श्रीलेखा पारीख व अल्फेया धनसुरा या महाराष्ट्राच्या  मुलींच्या संघाने जलतरण विभागातील 4 बाय 100 मीटर प्री स्टाईल रिले 4 मिनिटे 01.91 सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. कर्नाटकच्या संघाला 4 मिनिटे 02.47 सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर तमिळनाडूला 4 मिनिटे 09.64 सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article