कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राने पटकवले सर्वोत्तम राज्य विजेतेपद

06:58 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे पदकांचे द्विशतक : 54 सुवर्णपदकासह एकूण 201 पदकांची कमाई

Advertisement

वृत्तसंस्था/ डेहराडून

Advertisement

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकविणाऱ्या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने शुक्रवारी गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला. या दिमाखदार समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सर्वोत्तम राज्य विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी. टी. उषा उपस्थित होते.  पदकतक्त्यात सेनादलाने 68 सुवर्णांसह एकूण 121 पदके जिंकत पहिले स्थान मिळविले तर 54 सुवर्णांसह 201 पदके मिळवित दुसरे तर हरियाणाने 48 सुवर्णासह 153 पदके जिंकत तिसरे स्थान घेतले. 14 सुवर्णांसह 80 पदके पटकावणाऱ्या कर्नाटकला मात्र पाचव्या स्थानावर समाधान मानवे लागले.

उत्तराखंडातील स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्य अशी एकूण 201 पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्र महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा राज्यातील संघांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला. अहमदाबाद, गोवा पाठोपाठ उत्तराखंड स्पर्धेत महाराष्ट्राने देशातील संघांमध्ये अव्वल येण्याची ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली आहे. तब्बल 27 क्रीडाप्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॉस्टिक्समध्ये सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला आहे. सर्वोत्तम संघाचा मानही आपण पटकविला आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग तिसऱ्यांदा राज्यांच्या संघात अव्वल स्थान संपादन केले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. पदकविजेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

नामदेव शिरगावकर, महासचिव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन.

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या पदकाचे द्विशतक

महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 38 व्या स्पर्धेतही द्विशतकी कामगिरी करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मल्लखांबपटू यशाने महाराष्ट्राने 201 पदके जिंकून स्पर्धा गाजवली.

उत्तराखंडातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्य पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले आहे. गत गोवा स्पर्धेत महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 67 रौप्य व 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदाही 200 पदकांचा पल्ला महाराष्ट्राने पूर्ण करण्याचा इतिहास घडविला आहे. स्पर्धेच्या 17 व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मल्लखांब स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हते. स्पर्धा समितीने शुक्रवारी सकाळी पदकाचा अंतिम तक्ता जाहीर केला. यामध्ये मल्लखांबमधील 3 कांस्यपदकांमुळे महाराष्ट्राने पदकाचे द्विशतक पूर्ण केले. शार्दूल हृषिकेश, रिषभ घुबडे व दर्शन मिनियार यांनी महाराष्ट्रासाठी शेवटची पदके जिंकली. त्यापूर्वी अखेरचे सुवर्णपदकही रूपाली गंगावणे हिने पटकावले. मल्लखांबात शार्दूल हृषिकेशने पदकांचा चौकार झळकविला. आदित्य पाटील, सोहेल शेख मृगांक पाठारे यांनही पदकांची कमाई केली आहे. 4 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य पदकांची लयलूट मल्लखांबात महाराष्ट्राने करून विजेतेपदही प्राप्त केले. तब्बल 27 क्रीडाप्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॉस्टिक्समध्ये सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article