महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

06:13 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अलिगड (उत्तर प्रदेश)

Advertisement

अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस् स्टेडियमवर कुमार व मुलींच्या 43 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व  मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.  कुमार गटाचे हे 19 वे तर मुलींचे 10 वे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण 35 वे तर मुलींचे 26 वे राष्ट्रीय अजिंक्यपद ठरले आहे.

Advertisement

शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (3.30, 2.30 मि. संरक्षण व 2 गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर 24-20 असा 4 गुण व 5.10 मिनिटे राखून विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी 14-10 अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (2.10 मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (1.30 मि. संरक्षण), प्रणाली काळे (1.10 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (1.20 मि. संरक्षण व 6 गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (2 मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मुलांच्या गटातही महाराष्ट्राचे वर्चस्व

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडीसावर 33-29 अशी 1.30 मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची 18-14 ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (2.30, 1.20 मि. संरक्षण व 4 गुण), कृष्णा बनसोडे (1.40, 1.40 मि. संरक्षण व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (2.00, 1.20 मि. संरक्षण व 2 गुण ), सुनील पात्रा (1.30, 1.00 मि. संरक्षण व 6 गुण ) यांची लढत अपुरी पडली.

  सुहानी धोत्रे ‘जानकी‘, जितेंद्र वसावे ‘वीर ‘अभिमन्यू’चे मानकरी

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र वसावे हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा), संरक्षक : बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र).

  महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल

यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो. त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी 1 व मुलींनी 4 गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#socailmedia
Next Article