महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काहींचा मेंदू खोटा, राज्यापालांबाबत गप्प बसणारे दोषी, उदयनराजे संतापले

12:16 PM Dec 03, 2022 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

udayanrajebhosale- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत जे शांत आहेत, ते तितकेच दोषी आहेत. आमच्यात गट-तट आहेत, पण आता एक होण्याची वेळ आली आहे. काही लोकांच्या डोक्यात खोटा मेंदू हि वृत्ती दिसून येतेय. आता हि विकृती ठेचायची शाहिस्ताखानासारखी धडकी भरावयाची, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांना पात्र लिहीत अवमान करणाऱ्या विरोधात हल्लाबोल चढवला. राज्य सरकार अद्याप राज्यपालांबाबत गप्प का? असा सवाल करत त्याविरोधात येत्या दिवसांत मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. आज त्यांनी किल्ले रायगड इथे शिवसन्मान मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

राज्यभरातून अनेक शिवप्रेमी आज रायगडावर दाखल झाले होते. त्यावेळी उदयनराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडत राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमान सहन करणार नाही. त्यांचा अपमान आपण शांतपणे बघतोय. त्यांचा अपमान आम्ही सह करायचा का? असा सवाल केला.

Advertisement

जो-तो उठतोय आणि प्रतिक्रियावादी होतोय. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष केवळ छत्रपती शिवरायांचे नाव घेतायेत. त्यांचा सर्व धर्मभाव हा गुण कोणत्याच पक्षात नाही. पण प्रत्येक जातीत तेढ निर्माण करण्याचं काम सर्वच राजकीय पक्षाने सुरु केले आहे. प्रत्येकजण स्वार्थ बघत बसला तर देशाचे ३० तुकडे होतील. अशा शब्दात राज्यकर्ते आणि राजकीय पक्षाचा समाचार घेतला.

प्रत्येक जातीला मान देण्याची पद्धत छत्रपती शिवरायांनी सुरु केली. महाराजनी जुलमी राजवट मोडून काढली. शिवरायांचे राज्य हे जनतेचे राज्य म्हणून ओळखले जायचे. सत्तेत आलो पाहिजे असा विचार महाराजांनी कधीच केला नव्हता. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे. राज्यपालांवर कारवाई करणार आहे कि नाही ? राज्य सरकारची नीतिमत्ता गेली कुठे? तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल करत उदयनराजे यांनी गप्प बसणारे देखील राज्यपालाएव्हढेच दोषी असल्याचे सांगितले

सामान्य लोकच लोकशाहीचे राजे आहेत, राज्यपालाबाबत गप्प बसणारे दोषी आहेत. अपमानाविरोधात पेटून उठण्याची गरज आहे. अशा नेत्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.

खासदार उदयनराजे यांनी महाराजांना लिहलेल्या पात्रातील दहा मुद्दे

-तुमचा वंशज म्हणून नव्हे तर मावळा म्हणून बोलतोय.
-विचारांची कडेलोट करण्याची वेळ आली आहे म्हणून व्यथा मांडतोय.
-काही लोकांच्या डोक्यात खोटा मेंदू हि वृत्ती दिसून येतेय.
-मनाला वाटेल ते बोलणाऱ्यांची नांगी जिरवावे लागेल.
-आपल्याबददल चुकीचं बोलणार त्यांना सुनावणार, कोणतेही तडजोड करणार नाही.
-महाराज आमचे गट-तट वाढलेत, आता एक होण्याची वेळ.
-एकीचा ध्यास असेल तर चुकीचा इतिहास मिटवता येईल.
-विकृत लोकांशी कसं वागायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे.
-विकृती ठेचायची शाहिस्ताखानासारखी धडकी भरावयाची.
-महाराज मी वाचन देतो कि महपुरुषाचं अपमान होऊ देणार नाही.

Advertisement
Tags :
#satara #tbd #udyanrajeraigaudayanraje
Next Article