महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

06:39 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ठाण्याचा असलम इनामदारच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा

Advertisement

प्रतिनिधी/ अहमदनगर

Advertisement

अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे 21 मार्चपासून होणाऱ्या 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी  स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आज बारा जणांचा चमू जाहीर केला. ठाण्याच्या असलम इनामदारकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून नाशिकचा आकाश शिंदे उपकर्णधार असेल.

अहमदनगर येथे डिसेंबर 2023 साली झालेल्या 70 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी  स्पर्धेतून तसेच नुकत्याच ठाणे येथे झालेल्या 22 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेतून हा 29 जणांचा संघ निवडण्यात आला.  निवडण्यात आलेल्या या संघात विजेत्या मुंबई शहर आणि उपविजेत्या अहमदनगर संघाचे प्रत्येकी 3-3 खेळाडू असून ठाणे, नाशिक, रायगड, नांदेड, मुं.उपनगर, रत्नागिरी या जिह्याचे प्रत्येकी 1-1 खेळाडू निवडले गेले आहेत.

दरम्यान, हरियाणा येथील चरखी-दादरी येथे झालेल्या 69 व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ भारतीय रेल्वेकडून पराभूत झाल्याने उपविजेता ठरला होता. तर जानेवारी 2019 साली रोहा, रायगड येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय कबड्डी  स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केले होते. यंदाच्या हंगामात अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू शांताराम जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनात हा संघ जेतेपद मिळविण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरणार आहे. संघ निवड कागदावर तरी समतोल दिसत आहे. प्रत्यक्षात मैदानावर तो संघ कसा खेळतो यावर सर्व काही अवलंबून आहे.

निवडण्यात आलेला संघ खालीलप्रमाणे -

वरिष्ठ पुरुष संघ : 1) असलम इनामदार-संघनायक (ठाणे), 2) आकाश शिंदे  - उपसंघनायक (नाशिक), 3) संकेत सावंत (मुंबई शहर), 4) आदित्य शिंदे (अहमदनगर), 5) मयूर कदम (रायगड), 6) हर्ष लाड (मुंबई शहर), 7) शंकर गदई (अहमदनगर), 8) किरण मगर (नांदेड), 9) अरकम शेख (मुंबई उपनगर), 10) प्रणय राणे (मुंबई शहर), 11) ओमकार कुंभार (रत्नागिरी), 12) शुभम राऊत (अहमदनगर).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article