राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर
वृत्तसंस्था/मुंबई
हरिद्वार येथे होणाऱ्या पहिल्या 18वर्षाखालील मुले व मुली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. पुणे ग्रामीणच्या सानिका वाकसे हिच्याकडे मुलींच्या, तर परभणीच्या जीवन जाधव याच्याकडे मुलांच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. नुकत्याच पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे दि. 28 जून ते 1 जुलै या कालावधीत होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हा निवडण्यात आलेला संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. हा संघ 26 जुलै रोजी मध्यरात्री हरिद्वार एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता रवाना झाली, अशी माहिती एका पत्रकाद्वारे राज्य कब•ाr संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसारमाध्यमांना दिली. निवडण्यात आलेला संघ खालीलप्रमाणे आहे.
मुली 1) सानिका वाकसे-(संघनायिका)-पुणे ग्रामीण, 2) समीक्षा तुरे-परभणी, 3) बिदिशा सोनार-नाशिक शहर, 4) प्रतीक्षा गुरव- कोल्हापूर, 5) राणी भुजंग-जालना, 6) समीक्षा पाटील-नंदुरबार, 7) सेरेना म्हसकर-मुंबई उपनगर पूर्व, 8) संतोषी थोरवे-पिंपरी चिंचवड, 9) पूजा चिंदरकर-मुंबई उपनगर पश्चिम 10) अक्षरा गुरव-रायगड, 11) वैष्णवी इनामदार-सातारा, 12) कार्तिकी घेनंद-पिंपरी चिंचवड, 13) मिताली गावडे-सिंधुदुर्ग, 14) वर्षा बनसुडे-पुणे ग्रामीण.
मुले 1) जीवन जाधव (संघनायक)-परभणी, 2) सारंग रोकडे- परभणी, 3) अथर्व सोनवणे-पिंपरी चिंचवड, 4) ऋषिकेश कदम-परभणी, 5) हर्षल बागल-जळगाव, 6) स्वराज मुळे-उस्मानाबाद, 7) सोहम कदम-रत्नागिरी, 8) अमोल टिके-औरंगाबाद, 9) जुनेद खाटिक-जळगांव, 10) स्मित पाटील-ठाणे ग्रामीण, 11) तुषार डांगे- औरंगाबाद, 12) प्रसाद दिघोळे-पिंपरी चिंचवड, 13) सुरज चांदणे- पुणे ग्रामीण, 14) रोहन बिले-पुणे शहर.