कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

MH SCC Board Result : कोकण बोर्ड सलग 14 वर्षे अव्वल, मुलींचींच बाजी कायम

12:53 PM May 14, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.82 टक्के

Advertisement

रत्नागिरी : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेच्या ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात कोकण बोर्डाने अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेतही सलग 14 व्या वर्षी एक नंबर येण्यच्चा मान पटकावला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 98.82 टक्के इतका लागला असल्याची माहिती कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा 98.58 टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.32 टक्के इतका निकाल लागला आहे. या निकालातील मुला-मुलींची तुलनात्मक स्थिती पाहता मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 0.63 टक्के अधिक राहिले आहे. राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

यासंदर्भात या दिवशी दुपारी 1 वाजता कोकण बोर्डात पत्रकार परिषद घेत निकालाची माहिती क्षीरसागर यांनी दिली. यावेळी सहसचिव दीपक पवार, सहाय्यक सचिव मनोज शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे कोकण बोर्ड स्थापन होऊन आज 14 वर्षे झाली आहेत. पण हे बोर्ड स्वतंत्र झाल्यानंतर कोकणची पोरं हुश्शार.. असे म्हणणे सार्थ ठरले आहे.

गेली सलग 14 वर्षे 10 वी वा 12 वीची परीक्षा असो या दोन्ही परीक्षांच्या निकालात संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वनचा दबदबा कायम राखला आहे. नुकत्याच लागलेल्या 12 वी परीक्षेच्या निकालातही हे अव्वलस्थान कायम राखले होते. त्यानंतर आता दहावी परीक्षेतही प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवण्याची कौतुकास्पद कामगिरी कोकण बोर्डाने केली आहे.

यावर्षी 2025 मध्ये दहावी परीक्षेसाठी कोकण बोर्डातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून एकूण 26,901 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 26,861 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. मूल्यमापन केलेले 26,546 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 98.82 टक्के इतके आहे. त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 13 हजार 666 मुलांचा तर 12 हजार 880 मुलींचा समावेश आहे.

जिल्ह्यात या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 17 हजार 756 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्dयाचा निकाल 98.58 टक्के लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 8 हजार 790 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या जिल्ह्याचा निकाल 99.32 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात 9 हजार 281 मुलगे या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 9 हजार 114 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.

ही टक्केवारी 98.20 टक्के इतकी आहे. तर 8 हजार 730 मुली परीक्षेला प्रविष्ठ होत्या. त्यापैकी 8 हजार 642 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ही टक्केवारी 98.99 टक्के इतकी आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्dयात 4 हजार 590 मुलगे प्रविष्ठ होते. त्यापैकी या परीक्षेत 4 हजार 552 उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 99.17 इतकी आहे. तर 4 हजार 260 मुली प्रविष्ठ होत्या.

त्यापैकी 4 हजार 238 मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी 99.48 टक्के इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 0.19 टक्के इतकी घट झाली आहे. मार्च 2024 चा कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्के इतका होता. पण यावर्षी 98.82 टक्के इतका लागला आहे.

पुनर्परीक्षार्थींचा निकाल 58.66 टक्के

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल 58.66 टक्के लागला आहे. त्यामध्ये जिल्ह्dयातून प्रविष्ठ झालेल्या 104 पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण होत हा निकाल 56.73 टक्के लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रविष्ठ झालेल्या 46 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होत हा निकाल 63.04 टक्के लागला आहे.

17 नंबरच्या परीक्षार्थींचा निकाल 88.36 टक्के

17 नंबरचा फॉर्म भरून कोकण बोर्डाच्या या परीक्षेत बसलेल्या परीक्षार्थींचा निकाल 88.36 टक्के इतका निकाल लागला आहे. त्यात 318 प्रविष्ठ असलेल्या परीक्षार्थींपैकी 281 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 208 पैकी 183 परीक्षार्थी उत्तीर्ण होत हा निकाल 87.98 टक्के लागला. तर सिंधुदुर्गमधील 110 पैकी 98 परीक्षार्थी उत्तीर्ण होत हा निकाल 89.09 टक्के लागला आहे.

दहावीच्या निकालातही मुलीच आघाडीवर

बारावी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती. त्यानुसार दहावीच्या निकालातही मुलीच हुश्शार असल्याचे सिध्द झाले आहे. यावर्षी 2024 च्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुले व मुलींची तुलना करता या परीक्षेत 13 हजार 871 प्रविष्ठ मुलगे होते. त्यापैकी 13 हजार 666 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.

मुलांचे हे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.52 टक्के इतके आहे. तर 12 हजार 990 मुली या परीक्षेसाठी प्रविष्ठ होत्या. त्यापैकी 12 हजार 880 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण 99.15 टक्के इतके आहे. या मुले-मुलींच्या निकालाची तुलनात्मक स्थिती पाहता मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 0.63 टक्के अधिक राहिले आहे.

2012 या स्थापनेपासून कोकण विभागीय मंडळाचा आतापर्यंतचा निकाल:

मार्च 2012 -93.94 टक्के, मार्च 2013 -93.79 टक्के, मार्च 2014- 95.57 टक्के, मार्च 2015 -96.54 टक्के, मार्च 2016 -96.56 टक्के, मार्च 2017-96.18 टक्के, मार्च 2018 -96.00 टक्के, मार्च 2019 -88.38 टक्के, मार्च 2020 -98.77 टक्के, सन 2021 - 100 टक्के, मार्च 2022 - 99.27 टक्के, मार्च 2023 -98.11 टक्के, मार्च 2024 -99.01, फेब्रु.-मार्च 2025 -98.82 टक्के.

राज्यात कॉपीमुक्त अभियान अन् निकालातही कोकण विभाग प्रथम

गतवर्षी या परीक्षेत कोकण बोर्डात केवळ एक गैरप्रकार आढळला होता. पण यावर्षी 2025मध्ये एकही गैरप्रकरण परीक्षेदरम्यान आढळलेले नाही. त्यामुळे निकाल व कॉपीमुक्त अभियान यामध्ये कोकण विभाग अव्वल राहिला आहे. कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.

बारावीप्रमाणे दहावीत दोन्ही मंडळांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोकण व कोल्हापूर विभाग अव्वल असल्याचा कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

निकालाने उत्तुंग भरारी घेतलीय 

कोकण विभागाने, विभागीय मंडळ स्थापनेपासून म्हणजे सन 2012 पासून प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. या उत्तम निकालासाठी या परीक्षेसाठी बसलेले सर्व विद्यार्थ्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द सार्थकी ठरली व निकालाने उत्तुंग भरारी घेतली आहे. मागच्या वर्षेच्या तुलनेत यावर्षेच्या निकालात किंचित घट झाली आहे. पण या निकालाच्या दर्जात वाढ झाली आहे.

बोर्डाच्या स्थापनेला 2012 ला हा विभाग संपूर्ण राज्यात प्रथम होता आणि आजही 14 व्या वर्षापर्यंतेच्या प्रवासात प्रथमच राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या साऱ्या यशामागे सर्व शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी,कोकण बोर्डाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, पोलीस विभाग अशा साऱ्यांचे प्रयत्न, मार्गदर्शन, सहकार्य मोलाचे ठरले आहे, असे कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

नापासांसाठी शाळा काढण्याची गरज: अॅड. विलास पाटणे

बारावीत 11,5096 तर दहावीमध्ये 9,1146 असे मिळून महाराष्ट्रात यावर्षी एकूण 20,6242 विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांना नापास करून त्याच वर्गात ठेवल्याने शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होते, असे कोणतेही संशोधन सिद्ध करीत नाही. उलट कपाळावर नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. मार्कलिस्ट म्हणजे आयुष्याचा ताळेबंद नव्हे व दहावीची परीक्षा ही अंतिम परीक्षा नसते, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

यशाचा एक दरवाजा बंद झाला तरी तुम्हांला अनेक दरवाजे खुणावत आहेत. नापास विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यासाठी समाजाने त्यांच्या कौशल्य क्षमतांचा विकास केला पाहिजे. तसेच नापासांसाठी वेगळी शाळा काढण्याचा प्रयोग राबवण्याची गरज आहे. त्यांना मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. तसेच याचा समाजशास्त्राrय अभ्यास करण्याचे आव्हान आपण पेलले पाहिजे, असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष व अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले.

आजपासून गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधीत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावऊन             स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध कऊन देण्यात आली आहे.

यासाठी आवश्यक अटी /शती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी बुधवार, 14 ते 28 मे 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्या सोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क       याद्वारे भरता येईल.

उत्तरपत्रिकेचे करता येणार पुनर्मूल्यांकन

फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावऊन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

श्रेणी/गुण सुधार योजनेतून मिळणार तीन संधी

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (.10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 3 संधी (जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026) श्रेणी/गुण सुधार योजना                योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.

295 शाळांचा निकाल 100 टक्के

Advertisement
Tags :
@kolhapur#Rajesh Kshirsagar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakonkan vibhagMaharashtra SCC Board Result 2025MH SCC Board Result 2025
Next Article