महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामध्ये देशात नंबर वन! पूजा खेडकर प्रकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार

03:27 PM Jul 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
prithviraj chavan
Advertisement

फेक नॅरेटीव्हला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुरुवात केली, विधानसभेला महाविकास आघाडीच सत्तेत येणार

सातारा प्रतिनिधी

Advertisement

नुकताच एक अहवाल आलेला आहे. त्यात 2020 मध्ये देशात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्यामध्ये महाराष्ट 37.5 टक्क्यावर आहे. 2022 मध्ये 37.7 टक्के महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. दरडोई उत्पन्नात देशात महाराष्ट्र क्रमांक 1 वरुन 11 व्या क्रमांकावर आले आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये राज्य क्रमांक 1 वर गेले आहे. विदारक चित्र राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या अंतर्गत बैठकीत कार्यकर्त्यांना विरोधकांना ठोकून काढा असे आदेश दिले असले तरीही जनताच सत्ताधाऱ्यांना ठोकून काढेल, अशा शब्दात चव्हाण यांनी उत्तर दिले.

Advertisement

काँग्रेस भवनात आयोजित आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, रणजित देशमुख, झाकीर पठाण, अन्वरपाशा खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. 2020 मध्ये 37.5 तर 2022 मध्ये 37.7 टक्के राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. राज्याची लोकसंख्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात 10 टक्के आहे. लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात शेतकऱ्यांच्या चौपट आत्महत्या झालेल्या आहेत. राज्यात सगळयात जास्त आत्महत्या या अमरावती जिह्यात झालेल्या आहेत. नाशिक, कोकण यांचाही नंबर त्या पाठोपाठ लागतो आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने वारंवार भूमिका घेतली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. कांदा उत्पादन निर्यात बंदी, शेतीमालाला भाव नाही, असे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार सोडवत नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत शेतकरी सुखी असणार नाही, हाच आमचा अजेंडा असणार आहे. महाराष्ट्राकरता हे भूषणावह नाही. राज्याचे दरडोई उत्पन्न क्रमांक 1 वरून क्रमांक 11 वर केले आहे. याची कबुली स्वत: अर्थमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती घसरत चालली आहे, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

पुजा खेडकर प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे
पूजा खेडकर या महिलेने खोटी प्रमाणपत्र दिलेली आहेत. तिचे वडील वंचितचे उमेदवार होते. केंद्र सरकारच्या डी.ओ.पी.टी मंत्रालयाच्या अधीन यूपीएससी काम करते. युपीएसचे प्रशिक्षण देणे, परीक्षा घेणे, उत्तीर्ण झालेल्यांना केडर देणे, त्यांच्यावर कारवाई करणेही कामे डीओपीटी विभाग करते. डीओपीटी विभाग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत चालते. डीओपीटीने चुका केल्या आहेत. त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पाहिजे. पूजा खेडकर हिची हिस्ट्री कलर फुल आहे. तिचे वडील क्लास वन अधिकारी होते. पूजा खेडकर हिने ओबीसीचे आणि दिव्यांग प्रमाणपत्र खोटे जोडले गेले आहे. युपीएससीमध्ये सगळया गोष्टी तपासून घेतल्या जातात. मग हिच्या बाबतीच वेगळे काय?, दिव्यांग प्रमाणपत्र खोटे मिळवले आणि एाबीसीचे खोटे प्रमाणपत्र मिळवले त्याचे दोन गुन्हे घडले आहेत. तिच्या वडिलांनी वंचितमधून निवडणूक लढवली. भाजपकरीता त्यांनी महत्वाची भूमिका तिच्या वडिलांनी लढवली आहे. वडिलांनी दिलेल्या अॅफिडेव्हीटमध्ये सांपत्तिक स्थिती ही 40 कोटीची दर्शवली आहे. पूजा खेडकर हिने दिलेल्या शपथपत्रात स्वतंत्र आईकडे रहात असल्याचा उल्लेख करत प्लॅट असल्याचे नमूद केले आहे. तिची आई मनोरमा हिचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे आहे. पूजाला 821 रँक होती. तरीही तिची कागदपत्रे तपासणी करताना डीओपीटी विभागाने डोळे झाकले होते का?, तिने दिव्यांग प्रमाणपत्र हे अमरावतीतून मिळवले. तिची वैद्यकीय तपासणी करता युपीएससीने सहा वेळा एम्सला बोलवले तरीही ती गेली नाही. असे असताना तिला होम केडर देण्यात आले. ट्रेनिंगला पहिलं पोस्टिंग भंडारा जिल्हा मिळाला. पण तिने एकाच दिवसात पुणे करुन घेतले. दिल्ली पोलिसांनी तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तिच्या वडिलांनी वंचितकडून उमेदवारी लढवली होती. ती याच कारणासाठी का?, भाजपाला फायदा व्हावा, परंतु मतदारांनी त्यांना नाकारले आहे.

युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला ओह. त्यांची तर अजब कहाणी आहे. कमी वयात ते देशातील एका विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून कार्यभार पहात होते. ते बारावीला नापास झाले होते. त्यांना यूपीएससी होता आले नाही. म्हणून त्यांच्याकडे अध्यक्षपद दिले आहे काय?, अजूनही त्यांचा कार्यकाळ सहा वर्ष आहे. असे असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजूनही सहा वर्षे त्यांची कार्यकाळाची होती. ते जबाबदारी टाळू शकत नाहीत. या सरकारचा गलथान कारभार सुरु आहे. आमच्या वेळी कधी पेपर फुटले नाहीत. या प्रकरणात मनोज सोनी यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. किती माणसं खोटी प्रमाणपत्र देऊन घुसले चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

जनताच भाजपाला धडा शिकवेल
परवा फडणवीस यांनीच भाजपच्या अंतर्गत बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांना सूचना केली की काहीही झाले तरी विरोधकांना ठोकून काढा, उपमुख्यमंत्री या पदावर असताना ठोकाठोकीची भाषा शोभते काय, निवडणूक आयोग याची दखल घेणार नाही पण जनता मात्र याची नोंद घेईल. भ्रष्टाचाराची भाषा करतात. एवढ्या ईडीच्या कारवाया केल्या. एकातरी ईडीच्या प्रकरणाचा निकाल लागला का, हे आता चालणार नाही. लोकसभेला जनतेन दाखवून दिले आहे तेच विधानसभेला होईल, जनताच दाखवून देईल, सत्तांतर अटळ आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार
लोकसभेला साताऱ्यात आम्ही कमी पडलो. आणखी काम करणे गरजेचे होते. पैसा चालला असला तरीही आम्ही अजून काम करायला हवे होते, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच राज्यात लढवली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते बसतील, जिथे जो उमेदवार निवडून येईल त्यास तिकीट दिले जाईल, उद्या दिल्लीत बैठक आहे तिन्ही पक्षाची तेव्हा चर्चा होईल असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, म. गांधी यांच्या वधाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनीच आरएसएसवर बंदी घालती होती. ती दहशतवादी संघटना आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी आरएसएसच्या कार्यालयात जायचे नाही असा नियम केला होता. या मोदी सरकारने ती बंदी उठवली आहे. हे सरकार कोणत्या दिशेने चालले आहे. ज्या मनूस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेबांनी केले. त्याच मनूस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात अभ्यासक्रमात मागच्या दाराने आणण्याचा प्रयत्न होता असे सांगत ते म्हणाले, फेक नॅरेटिव्हला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुरुवात केली. 400 पारचा नारा कोणी दिला. मुस्लिम समाजाबद्दल केलेली वक्तव्य पहा, मटण, मांस, मच्छी, मंगळसुत्र यावरुन केलेली निवडणुकीच्या काळातील त्यांची भाषणे पहा. म्हणून त्यांना जनतेने बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली ती घटना कधी घडली. मोदी आता सत्तेत आले. मोदींना कधी स्वप्न पडले होते, अशा शब्दात टीका करत आता राज्यात सत्तातंर अटळ आहे. फडणवीस यांनी विरोधकांना ठोकाठोकीच आदेश दिले तरी जनताच मतातून उत्तर देईल, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

उद्या लाडके आईबाबा येईल अर्ज त्याचेही भरा
लाडकी बहिण या योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, लाडकी बहीण ही सरकारची योजना आहे. चुकीचे कोण करणार नाही. उद्या लाडके आई बाबा येईल, त्याचेही अर्ज भरा, लाभ घ्या. परंतु ज्याप्रकारे युपीए सरकारने माणसाला माणसाचे हक्क दिले. तसे काहीतरी या सरकारने केले पाहिजे. लाडकी बहिणला 60 वर्षाची मर्यादा घातली होती. मी विरोध केला तेव्हा सरकारने 65 केली. वयोमर्यादा काढून टाकली पाहिजे. मात्र, यामुळे राज्यामध्ये वित्तीय घाटा होणार आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळे भाजपाचे काम बोगसगिरीचे सुरु आहे. कराडात कोणीतरी पत्र मिरवते आहे कोट्यावधीचा निधी स्टेडीयमला आणला म्हणून. पण केवळ कराड स्टेडियमला 10 लाख आले आहेत, अशी टीका नाव न घेता भाजपाचे कराडचे नेते अतुल भोसले यांच्यावर केली.

Advertisement
Tags :
#farmer suicide#PM Narendra ModiMaharashtra Number
Next Article