महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठरलं! 'या' महिन्यांत होणार महापालिका निवडणूक

12:57 PM Jun 06, 2022 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील १४ महानगपालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरल्याची माहिती आहे. ही निवडणूक जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होतील, असा अंदाज व्यक्त करत निवडणूक आयोगाने संकेत दिले आहेत. तर ३१ मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळत पंधरा दिवसात राज्यातील महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यामुळे राज्यातील १४ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषद परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता होती. त्यानुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत ही पार पडली.

Advertisement

राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत

राज्यातील 14 महानगरपालिकांच्या मुदती संपल्या आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेचा समावेश आहे. तर त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, या शहरातील महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

या २५ जिल्हा परिषदेची निवडणूक रखडली

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

आयुक्तांना दिलेल्या पात्रात म्हंटले आहे कि, स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक. त्याप्रमाणे १४ महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसेच, या निवडणुकीसाठीची मतदार यादी ७ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असंही निवडणूक आयोगानं या पत्रात नमूद केलं आहे.

Advertisement
Tags :
#Maharashtra Local Body Election#muncipalelectionElection2022
Next Article