...उठाव केला नसता तर तुम्हाला विरोधात बसावं लागलं असतं; शिरसाटांचा फडवीसांना टोला
आम्ही उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असत असा थेट पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आम्ही 115 जण असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
लोकसभेच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही जागावाटपावर चर्चा चालू आहेत. महायुतीच्या जागावाटपावरून दुसऱ्या फळीतील नेते एकमेकांची उणीदुणी काढत असतानाच आपापल्या पक्षासाठी अधिक जागांची मागणी करत आहेत. केंद्रिय मंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्राचा दौरा करून जागावाटपासंदर्भात सुचना दिल्या आहेत. काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाजपवर आरोप करताना ते केसाने गळा कापत असल्याचा आरोप केला.
त्यानंतर, माध्यमांशी रामदास कदमांच्या आरोपांना उत्तर देताना सारवासारव केली. तसेच रामदास कदम यांना आठवण करून देताना आम्ही 115 असूनही मुख्यमंत्रीपद घेतलं नसल्याची आठवण करून दिली.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, "भाजपाचे १०५ आमदार आहेत हे खरं आहे...त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत हेदेखील खरं आहे....परंतु, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर त्या १०५ जणांना अजूनही विरोधात बसावं लागलं असतं हेदेखील तितकंच सत्य आहे. ज्यावेळी भाजपचे १०५ आमदार विरोधात बसले होते. त्यानंतर शिंदेंनी उठाव नसता तर त्या १०५ जणांना विरोधातच बसावं लागलं असतं. आज एकनाथ शिंदेंमुळे ते सत्तेत आहेत आणि त्यांच्यामुळे एकनाथ शिंदेही सत्तेत आहेत. दोन्ही बाजू खऱ्या आहेत. त्यामुळे कोणीही कोणाचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये." असेही त्यांनी म्हटले आहे.