महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र सर्वात स्वच्छ राज्य

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंदूर, सुरत सर्वात स्वच्छ शहर : नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर : केंद्र सरकारकडून ‘स्वच्छता सर्वेक्षण-2023’ विजेत्यांचा गौरव

Advertisement

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहरे म्हणून इंदूर आणि सुरतची निवड झाली असून, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुऊवारी जाहीर झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालात ही माहिती देण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर मध्य प्रदेश दुसरा आणि छत्तीसगढने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम् येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

इंदूरला सलग सातव्यांदा स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला. तर, सुरतला पहिल्यांदाच संयुक्त स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे. 2017 पासून स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर प्रथम येत आहे. लोकसहभाग, नवनवीन शोध आणि परस्पर समन्वयाची भावना यामुळे इंदूर देशातील इतर शहरांपेक्षा पुढे आहे. ‘वेस्ट टू वेल्थ’ या थीमवर आधारित या सर्वेक्षणात विविध श्रेणींमध्ये 4,400 हून अधिक शहरांमध्ये खडतर स्पर्धा पाहायला मिळाली. इंदूरने गुऊवारी सलग सातव्यांदा भारतातील ‘स्वच्छ शहरां’मध्ये अव्वल स्थान पटकावले. या यशात शहराच्या प्रभावी, शाश्वत आणि टिकाऊ कचरा व्यवस्थापन प्रणालीचा मोठा वाटा असल्याचे सनदी अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुऊवारी दिल्लीतील भारत मंडपम् येथे एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी शहरी प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय, इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव आणि महापालिका आयुक्त हर्षिका सिंह उपस्थित होते. ओडिशा येथील वालुकाशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आपल्या कलेने भारतातील स्वच्छतेच्या प्रारंभाची शिल्पे चित्रित करून कार्यक्रमाची सुऊवात केली. तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी स्वच्छता गीत सादर केले.

राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

राज्यांच्या स्वच्छतेच्या क्रमवारीत महाराष्ट्र प्रथम आला आहे. मध्य प्रदेशला दुसऱ्या स्वच्छ राज्याचा दर्जा मिळाला आहे. स्वच्छ राज्यांमध्ये छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावषी देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून मध्य प्रदेशची निवड करण्यात आली होती, तर छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर होता. अशा प्रकारे दोन्ही राज्यांच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. राज्यभरातील सामान्य लोकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया, स्वच्छतेबाबत राज्यभर चालवले जाणारे प्रकल्प, अर्थसंकल्पीय वाटप इत्यादींच्या आधारे राज्यांची स्वच्छ क्रमवारी निश्चित केली जाते.

भोपाळच्या शिरपेचात दुहेरी मुकुट

भोपाळला देशातील सर्वात स्वच्छ राज्य राजधानीचा किताब मिळाला आहे. गेल्यावषीही भोपाळने हे विजेतेपद पटकावले होते. तसेच 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मेट्रोपॉलिटन शहरांच्या श्रेणीमध्ये भोपाळ हे देशातील पाचवे स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले. महापौर मालती राय यांच्यासह महापालिका आयुक्त फ्रॅक नोबल ए यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. गेल्यावषी देशातील स्वच्छ शहरांमध्ये भोपाळ सहाव्या क्रमांकावर होते. 2017 आणि 2018 मध्ये सलग दोन वर्षे देशात दुसरा क्रमांक पटकावला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article