For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Din 2025 : साताऱ्यात मुस्लिम युवकांनी सुरु केली 'शिवजल' पाणपोई, उपक्रमाचे कौतुक

10:59 AM May 02, 2025 IST | Snehal Patil
maharashtra din 2025   साताऱ्यात मुस्लिम युवकांनी सुरु केली  शिवजल  पाणपोई  उपक्रमाचे कौतुक
Advertisement

मुस्लिम युवकांच्या सामाजिक संस्थेने पोवई नाक्यासह चार ठिकाणी 'शिवजल पाणपोई' सुरू केल्या

Advertisement

सातारा : "मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना..." हा उर्दू ओळ केवळ शेर नसून, माणुसकीच्या तत्वाचा मूर्त स्वरूपाचा अनुभव महाराष्ट्र दिनी साताऱ्यात पाहायला मिळाला. खिदमत-ए-खल्क या मुस्लिम युवकांच्या सामाजिक संस्थेने पोवई नाक्यासह चार ठिकाणी 'शिवजल पाणपोई' सुरू करून धार्मिक एकात्मतेचा आणि मानवतेचा नवा आदर्श निर्माण केला. व अन्य तीन ठिकाणी शिवजल पानपोई निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

मुस्लिम समाजातील युवकांनी एकत्र येत शहरात 'शिवजल' नावाने मोफत पाणपोई सुरू करणे, ही केवळ एक सेवा नव्हे, एक सामाजिक संदेशही आहे. 'शिवजल' या नावातून त्यांनी हिंदू संस्कृतीला सलाम करत धर्मात एकतेचं पाणी मिसळले. यामुळेच हा उपक्रम सामान्य सामाजिक कार्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असल्याची चर्चा आहे. शिवाय या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकातूंन कौतुक होत आहे.

Advertisement

या उपक्रमाचं लोकार्पण मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खिदमत-ए-खल्कच्या कार्याचं भरभरून कौतुक करत म्हटलं, "पाणी ही मूलभूत गरज आहे, पण हे केवळ पाणी नाही तर ही माणुसकी आहे. ही एकता आहे, हा नितांत गरजेची सलोखा आहे." या प्रसंगी भाजपच्या रेणू येळगावकर, प्रगती पाटील आणि शाहीर फरांदे यांचे पुत्र वैभव फरांदे सुजित आंबेकर यांनी देखील या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

संस्थेचे सादिक शेख आणि आसिफ खान यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, "उन्हाच्या झळांनी त्रस्त सामान्य माणसाला, धर्म न पाहता थंड पाणी मिळावं हीच आमची भावना आहे. पुढील काळात शहरात इतर भागांतही अशा पाणपोया सुरू केल्या जातील. या कार्यक्रमास अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध धर्मांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शहरात माणुसकीचा ओलावा पसरत आहे आणि सर्वत्र खिदमत-ए- खल्क संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे. माणुसकीला धर्म नसतो, आणि आजच्या या पवित्र दिवशी हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवजलच्या प्रत्येक थेंबातून आता सलोख्याचीच धार वाहते आहे.

Advertisement
Tags :

.